कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी आता केंद्र सरकारने देशात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. भारतामध्ये 21 जून पासून केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सार्या कोविड 19 प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यास सुरूवात केली आहे. या सोबतीने खाजगी हॉस्पिटल देखील लसीकरण मोहिमेमध्ये उतरली आहे. भारतातील कोविशिल्ड, कोवॅक्सिन सोबतच आता स्फुटनिक वी आणि अन्य परदेशी लसी देखील आल्या आहेत. पण अजूनही लोकांच्या मनात या लसीकरणाबाबत अनेक प्रश्न आहेत. लसीच्या प्रभावापासून ते साईड इफेक्ट्स पर्यंत एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. याचं निराकरण करण्यासाठी देखील सरकार वेळोवेळी काही माहिती प्रसिद्ध करत आहे.
तळीरामांसोबतच अनेक सामान्य लोकांच्या मनात असलेला एक प्रश्न म्हणजे कोविड 19 लस घेतल्यानंतर मद्यपान केले जाऊ शकते का? अल्कोहल घेता येऊ शकते का? लस घेतल्यानंतर किती दिवस दारू पासून दूर रहावे लागेल? तुमच्या देखील मनात हा प्रश्न आला असेल तर टेंशन घेऊ नका इथे पहा सरकार कडूनच या तुमच्या मनातल्या प्रश्नावर काय उत्तर आलंय?
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर त्यांनी जारी केलेल्या प्रश्न -उत्तरांमध्ये त्यांनी लोकांच्या मनातील या प्रश्नाचं देखील उत्तर दिले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, अद्याप तज्ञांना अल्कोहल मुळे लसीचा प्रभाव कमी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. COVID 19 Vaccine FAQs: कोविड 19 लसींमुळे वंध्यत्व येते का ते भविष्यात बूस्टर डोस घेण्याची वेळ आली तर तीच लस घ्यावी लागते का? पहा तुमच्या मनातील लसीकरणाबाबतच्या प्रश्नांची एक्सपर्ट उत्तरं.
29 जून 2021 पर्यंत दिलेल्या माहितीनुसार देशात 33 कोटी नागरिकांना कोविड 19 चा डोस देण्यात आला आहे.लसीकरणामध्ये सध्या देशात महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे. 3 कोटी पेक्षा अधिक लोकांना महाराष्ट्रात आतापर्यंत लस देण्यात आली आहे.