Brain-Eating Amoeba (PC- pixabay)

Brain-Eating Amoeba: कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या सर्व प्रकारांनी चीन, जपानसह संपूर्ण जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. चीन (China) मध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. संपूर्ण जग दहशतीत आहे. आता याच दरम्यान आणखी एका जीवघेण्या आजाराने जगभरात भीतीचे वातावरण पसरवले आहे. अमिबा असे या आजाराचे नाव आहे. दक्षिण कोरियामध्ये मेंदू खाणारा अमिबा (Amoeba) 50 वर्षांच्या निरोगी माणसाच्या शरीरात शिरला. त्यानंतर 10 दिवसांतच या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आता जगातील इतर देश अमीबाबाबत सतर्क झाले आहेत. या घटनेनंतर अमेरिकन हेल्थ एजन्सी सीडीसीनेही एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.

कोरिया टाईम्सच्या वृत्तानुसार, मेंदू खाणारा अमिबा दक्षिण कोरियातील 50 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात पोहोचला. हा व्यक्ती 10 डिसेंबर रोजी थायलंडच्या सहलीवरून परतला होता. त्यानंतर त्याच्यात संसर्गाची लक्षणे दिसू लागली. अहवालानुसार, अमिबामध्ये प्रवेश केल्यानंतर डोकेदुखी, उलट्या, शरीरात जडपणा आणि बोलण्यात अडचण यांसारखी लक्षणे रुग्णाला दिसू लागली. त्यानंतर त्याला आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आले. पुढील काही दिवसातचं या रुग्णाचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Fear Of COVID 19 Outbreak: भारतामध्ये कोविड 19 रूग्णसंख्येत जानेवारी मध्ये वाढीची शक्यता; पुढील 40 दिवस महत्त्वाचे - रिपोर्ट्स)

मेंदू खाणारा अमिबा म्हणजे काय?

नेग्लेरिया फॉलेरी हा एक पेशी असलेला सूक्ष्मजीव आहे, ज्याला मेंदू खाणारा अमिबा असेही म्हणतात. हा सूक्ष्मजीव नदी, तलाव किंवा तलावाच्या स्वच्छ पाण्यात आढळतो. 1965 मध्ये पहिल्यांदा या अमिबाचे केस सापडले होते. तो नाकातून मानवी शरीरात पोहोचतो आणि मेंदूमध्ये जातो. पोहणे किंवा दूषित पाण्यातून हा विषाणू नाकातून मेंदूवर हल्ला करतो. हा विषाणू मेंदूच्या ऊतींचा नाश करू लागतो. मेंदूच्या ऊतींचा नाश झाल्याने मेंदूला सूज येते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

मेंदू खाणाऱ्या अमीबा आजाराची लक्षणं -

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, नेग्लेरिया फाउलेरी लक्षणांचा संसर्ग झाल्यानंतर 1 दिवस ते 12 दिवसांदरम्यान खालील लक्षणे दिसू लागतात.

  • डोकेदुखी
  • ताप
  • मळमळ
  • उलट्या होणे
  • मानेचा त्रास
  • कंफ्यूजन
  • लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता
  • गोंधळून जाणे
  • कोमा, आदी

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, मेंदू खाणारा अमिबा अत्यंत घातक आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये या आजारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या संसर्गामुळे मेंदू फार लवकर पोकळ होतो आणि लक्षणे दिसू लागल्यानंतर 5 दिवसांत रुग्णाचा मृत्यू होतो. परंतु, पहिल्या दिवसापासून ते 18 व्या दिवसाच्या दरम्यान कधीही मृत्यू होऊ शकतो.