Hangover दूर करण्याचे '5' सोपे घरगुती उपाय !
Hangover (Photo Credit: PIxabay)

ख्रिसमस (Christmas), न्यू ईअर सेलिब्रेशन (New Year Celebration) काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे मज्जा-मस्ती बरोबरच पार्टीचीही धूम असणारच. पार्टी म्हटलं की खाण्याबरोबरच पिणं होणारच. पण पार्टीनंतर येणारा हँगओव्हर (Hangover) अगदी नकोसा वाटतो. Christmas, New Year Party चा आनंद घेऊनही हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स!

पार्टीच्या धमाकेदार सेलिब्रेशननंतर मळमळ, उलटी, डोकं चढ होणे, डिहायड्रेशन यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. पण काही साध्या सोप्या उपायाने तुम्ही हा त्रास झटपट पळवून लावू शकता. तर पाहुया हँगओव्हर दूर करणारे काही सोपे घरगुती उपाय...

अंड

अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे हे त्रास जाणवू लागतात. पण यावर अंड हा चांगला उपाय आहे. त्यामुळे हँगओव्हर दूर करायचा असल्यास उकडलेले अंडे अवश्य खा.

पाणी

डिहायड्रेशन हे हँगओव्हसचे प्रमुख लक्षण आहे. अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर वारंवार लघवीला होते. परिणामी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनपासून सुटका मिळविण्यासाठी भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होईल. थोड्या वेळाच्या अंतराने थोडे-थोडे पाणी पित राहा.

नारळपाणी

शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी भरुन काढण्यासाठी नारळपाणी अतिशय उत्तम ठरतं. त्याचबरोबर ते फॅट फ्री असून त्यात नैसर्गिक गोडवा असतो. नारळपाण्याच्या सेवनाने शरीराला पोटॅशियम आणि सोडिअम यांसारखे घटक मिळतात.

आलं

मळमळ आणि पोट खराब होणे, ही हँगओव्हरची अजून काही लक्षणे आहेत. आलं यावर अत्यंत गुणकारी ठरेल. कपभर आल्याच्या चहात मध घालून प्या. मधात भरपूर प्रमाणात फ्रुक्टोज असते. त्यामुळे हँगओव्हर दूर होण्यास मदत होते.

थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ

थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यास ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि शरीरातून टॉक्झिन्स दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल.