पार्टी (Photo Credit: Pixabay)

डिसेंबर महिना हा काहीसा आनंदी आणि आल्हाददायक वाटतो. गुलाबी थंडी, सुट्ट्या, ख्रिसमस (Christmas) आणि न्यू इयर सेलिब्रेशनची (New Year Celebration) सगळीकडेच धूम असते. मग पार्टी तर बनतेच. आणि पार्टी म्हणजे मज्जा, मस्ती, खाणं आणि पिणंही. त्यामुळे डाएट जरा बाजूला सरकतं. अशावेळी आपले आरोग्य सांभाळत पार्टी एन्जॉय करण्यासाठी या टीप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. Secret Santa ची सुरुवात कोणी केली ? काय आहे या परंपरेचे मूळ आणि इतिहास?

पार्टी सुरु होण्याआधी:

# पार्टीला जाण्याआधी भरपूर पाणी पिऊन घ्या. पुरेशी झोप घ्या आणि जेवणात पालेभाज्या खा. यामुळे पार्टीत तुम्ही पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह राहाल. ही सवय कायम लावून घेतल्यास आरोग्यासोबत सौंदर्यांतही भर पडते.

# पार्टी आणि सेलिब्रेशन च्या काळात धूम्रपान टाळाच. कॅफिनयुक्त पेय म्हणजेच सॉफ्ट ड्रिंक्स, आईसक्रीम, कॉफी, चहा, चॉकलेट्स आणि मद्याचे सेवन प्रमाणात करा. कारण या सगळ्यामुळे लिव्हरच्या डीटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नंतर त्रास होण्याची शक्यता असते.

# स्टीम बाथ घेतल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल. तसेच बॉडी ब्रशिंग केल्याने तुमचा रक्तप्रवाह सुधारून स्किन ग्लोइंग दिसण्यास मदत होते.

# वाढलेले वजन कमी करण्यासाठी अ‍ॅरोबिक्स, झुंबा सारखे डान्स प्रकार ट्राय करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आनंद ही मिळेल.

# आहारात सुकामेवा, फळे यांचा समावेश करा. पोषक आणि संतुलित आहार घ्या.

पार्टी दरम्यान:

# मद्याचे अतिरिक्त सेवन शरीराबरोबर मन ही नियंत्रित करते. त्याचबरोबर डीहायड्रेशनचा त्रास वाढतो आणि सुस्तावल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही पार्टी चा आनंद घेऊ शकत नाही.

# योग्य आहार घेतल्याने अल्कोहोलचे शरीरात नीट absorption होते. त्यामुळे धान्य, ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ खा.

पार्टीनंतर:

# कोणत्याही पार्टी किंवा सणानंतर शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे साखरेचे पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी फ्रेश फ्रुट ज्यूस किंवा ग्रीन टी घ्या.

# सकाळी नाश्त्याच्या आधी कोमट पाण्यात मध, लिंबाचा रस घालून घ्या. त्यामुळे तुमची पचन क्रिया पूर्ववत होईल. तसंच पार्टीत खाल्ले गेलेले आणि शरीरासाठी नको असलेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल.

# नियमित योगसाधना आणि ध्यानधारणा करा. त्यामुळे मन प्रसन्न आणि शांत राहील. आणि पार्टीमुळे वाढलेले कॅलरीज कमी होण्यास देखील मदत होईल.

# फळे, सलाड यांचे आहारातील प्रमाण वाढावा.

पार्टीचा आनंद कमी होऊ नये आणि आरोग्याचं गणित सांभाळता यावं यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.