Coconut Water Benefits : नारळपाणी पिण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हास माहित आहेत ?
नारळ (Photo credit : pixabay)

Coconut Water Benefits : उन्हाळ्यामध्ये तहान भागवायला अथवा घसा आणि पोट थंड राहावे म्हणून किंवा थंडीच्या दिवसांत शरीरातील आद्रता टिकून राहावी म्हणून हमखास नारळपाण्याचे सेवन केले जाते. बरेचवेळा आजारी व्यक्तीला इतर कोणते पदार्थ वर्ज्य असो वा नसो मात्र नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळाच्या झाडामुळे समुद्राचे पाणी केवळ पिण्यायोग्य बनत नाही, तर पाण्यात औषधी गुणधर्म देखील आणते. याचसोबत यात आढळणारे पौष्टिक तत्त्व शरीराला त्वरित उर्जा प्रदान करतात. शिवाय नारळपाणी हे पूर्णतः नैसर्गिक असल्याने अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्त नारळ पाण्याचे सेवन करू शकते. चला तर पाहूया काय आहेत नारळपाण्याचे फायदे.

> त्वचा योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी नारळाचे पाणी उत्तम पर्याय आहे. यामुळे चेह-यावरील पिंपल्स सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. नारळ पाणी हे एक उत्तम नैसर्गिक मॉश्चरायजर देखील आहे.

> नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने मांसपेशींचा त्रास कमी होतो. हे एक पोटॅशियम मिळवण्याचे उत्तम स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, मॅग्नेशियम, मॅगनीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

> नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित राहण्यास मदत होते.  घनदाट आणि काळेभोर केसांसाठी नारळ एक उत्तम नैसर्गिक कंडीशनर म्हणून देखील फायदेशीर ठरते. नारळाच्या पाण्याने केस धूतल्याने चमक येते तसेच केस मजबूत होण्यास मदत होते.

> शरीरात पाण्याची कमतरता, स्ट्रोक, हायपरटेंशन, किडनी स्टोन इत्यादी आजारांवर नारळाचे पाणी एखाद्या रामबाणासारखे फायदेशीर ठरते.

> नारळपाणी हँगओव्हरसाठी मदत करते. नारळाचे पाणी प्यायल्याने हँगओव्हर नष्ट होण्यास मदत होते.  दारू प्यायल्याने शरीरातील कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स नारळपाणी पुनर्स्थित करते.

> वजन घटविण्यासाठी नारळाचा उपयोग होतो. त्यात फायबर अधिक असल्याने ते खाल्ले तरी शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. म्हणून भूक लागली की खोबरे खा, यामुळे वजनही वाढणार नाही.

> दिवसातून दररोज एका नारळाचे प्या, किंवा दररोज जेवणाच्या अर्धा तास अगोदर 1 ग्लास नारळाचे पाणी प्या. हे 1 ते 2 महिने कायम केल्याने आपली पाचक प्रणाली सुधारते. पोटाची आतील बाजूही थंड राहते आणि शारीरातील pH चे स्थर नियंत्रणात राहते ज्यामुळे आम्लतेपासून आराम मिळतो.