Baby Names Viral On Social Media: अजब दुनिया, बाळाचे नाव 'पकोडा'; सोशल मीडियावर युजर्सकडून हटके प्रतिक्रिया
baby Pakora | (Photo Credit - ANI/Twitte)

Unique Child Names: प्रत्येक आई वडीलांना आपल्या मुलाचे (Baby Names) नाव हटके असावे असे वाटते. त्यात काही गैरही नाही. हे नाव हटके असावे यासाठी आई-वडील आपल्या मुलाची नावे पुरानकाळाथील कथा, काव्यावरुन कधी प्रदेश किंवा एखाद्या चित्रपटातील पात्रावरुनही घेतात. त्यासाठी नामकरण विधी (Naming Ceremony) सोहळाही आयोजत केला जातो. काही आई-वडील आपल्या मुलाचे नाव चक्क एखाद्या चित्रपटाचेही ठेवतात. जसे की 'सैराट' चित्रपटावरुन प्रेरीत होऊन एका दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव सैराट ठेवले होत. लालू प्रसाद यादव यांनीही आपल्या मुलीचे नाव इंदिरा गांधी यांच्या काळातील एका कायद्यावरुन ठेवले होते. आताही सोशल मीडियावर (Social Media) एका बाळाचे नाव व्हायरल (Viral Baby Names) झाले आहे. या ब्रिटीश दाम्पत्याने (British Parents) बाळाचे नाव चक्क 'पकोडा' (Pakora) म्हणजेच भजी असे ठेवले आहे. होय, वाटले ना आश्चर्य. पण हे खरे आहे. घ्या जाणून.

ब्रिटीश दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव चक्क एका भारतीय पदार्थावरुन ठेवले आहे. वाढली ना उत्सुकता? होय. या दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव चक्क पकोडा (Pakora) असे ठेवले आहे. सांगितले जाते आहे की, या बाळाचे नाव त्यांनी पकोडा ठेवले कारण त्यांना हे नाव फार छान वाटले. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडमधील न्यूटाऊनएबी शहरात एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. ज्याचे नाव कॅप्टन टेबल असे आहे. रेस्टॉरंटने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका माहिती म्हटले आहे की, एका जोडप्याने आपल्या हॉटेलमधील पदार्थावरुन आपल्या बाळाचे नाव ठेवले आहे. हा पदार्थ आहे पकोडा. या रेस्टॉरंटने आपल्या बाळाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. (हेही वाचा, Kande Navami 2019: यंदाची कांदे नवमी बनवा स्वादिष्टपूर्ण, करुन पाहा या कांद्याच्या सोप्या 5 रेसिपी)

ट्विट

सोशल मीडियावर या लहान मुलाच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी नावाला साजेशा मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी या बाळाच्या आईवडीलांना सोशल मीडियाच्या माद्यमातून प्रश्न विचारला आहे की, असे कसे विचित्र नाव ठेवावे वाटले. काहींनी हे नाव आपल्याला फारच आवडल्याचेही म्हटले.