Kande Recipes (Photo Credits: YouTube)

आषाढी एकादशी ची सर्वच विठ्ठल भक्त आतुरतेने वाट पाहात असून एकादशीच्या 2 दिवस आधी साजरी केली जाणारी कांदे नवमी (Kande Navmi) ही महाराष्ट्रातील लोकांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. कारण 2 दिवसांनंतर चार्तुमासाला सुरुवात होते. या चार्तुमासात कांदा, लसूण, वांगे इत्यादी पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी होते.

यंदा ही कांदे नवमी 10 जुलैला आली असून या दिवशी कांद्याचे पदार्थ बनवले जातात. पुढील 4 महिने कांदा वर्ज्य असल्यामुळे विठूभक्त आपल्या घरातील कांदा, लसूण संपवण्यासाठी त्याचे पदार्थ बनवून कांदे नवमी साजरी करतात. या कांदे नवमी चे औचित्य साधून आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या 5 झटपट रेसिपी सांगणार आहो. या रेसिपी बनवून तुम्ही आनंदात आणि त्याच उत्साहात कांदे नवमी साजरी करू शकता.

1. भरलेल्या कांद्याची भाजी

2. खेकडा भजी

3. कांद्याची भाजी

4.कांद्याची चटणी

5. कांद्याचे थालिपीठ

Ashadhi Ekadashi 2019 निमित्त जाणून घ्या उपवासाचे ‘5’ आरोग्यदायी पदार्थ!

कांदे नवमी साजरी करताना जर अशा चमचमीत रेसिपी बनवल्या तर कांदे नवमी साजरी करण्याचा आनंद द्विगुणित होईल. ह्या रेसिपी अतिशय झटपट आणि सोप्या आहेत. त्यामुळे या बनवून कांदे नवमी साजरी केल्यास पुढील 4 महिने तुम्हाला कांद्याची आठवण देखील येणार नाही. नाही का?