Kande Navami 2020 Onion Recipeas (Photo Credits: Instagram)

यंदा 1 जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2020)  साजरी केली जाणार आहे. दरवर्षी या निमित्ताने पंढरपुरी (Pnadharpur)  जाणाऱ्या वारीचे आयोजन केले जाते, मोठा उत्सव पार पडतो मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे घरच्या घरी वारी करा असे आवाहन वारकऱ्यांना दिले आहे. आषाढी एकादशी ला जोडलेल्या अनेक गोष्टींमधील एक म्हणजे कांदा नवमी (Kanda Navmi)! आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यावेत यासाठी म्हणून एकादशीपूर्वी आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी केली जाते. आज ही कांदा नवमी आहे. या कांदा नवमीचे महत्व आणि यंदाच्या कांदा नवमी निमित्त करता येतील अशा पाच झटपट रेसिपीज आपण आता या लेखातून जाणून घेणार आहोत. Ashadhi Ekadashi 2020: पंढरपुरामध्ये तयारी अंतिम टप्प्यात; विठ्ठल रूक्मिणी मंदिर सजावट ते संचारबंदी नियम कोरोना संकटात असा असेल आषाढीचा सोहळा

कांदा नवमी चे महत्व

पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून या चार महिन्यात कांद्याचे सेवन टाळले जाते. कांद्यासोबतच लसूण, वांगं असे पदार्थ खाणं वर्ज्य केली जातात.नैसर्गिकरित्या या ऋतूमध्ये शरीरातची वाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे किमान आहारात वातूड पदार्थ टाळण्याचा नियम आहे.

कांद्याचे झटपट हटके पदार्थ

कांद्याची खेकडा भजी

भरलेल्या कांद्याची भाजी

कांद्याच्या रिंग्स

कांद्याची चटणी

कांदवणी

दरम्यान, अनेक ठिकाणी थोडा थोडा पाऊस सुरु झाला आहे, त्यामुळे जरी तुम्हाला नियम म्हणून हा सण साजरा करायचा नसेल तरी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही नक्कीच हे सगळे पदार्थ आवर्जून करता येतील.