Dhanteras 2023: दिव्यांचा सण दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा दिव्यांचा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi 2023) होते. छोटी दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. तसेच कोणत्याही वस्तू खरेदीसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.
असं म्हटलं जात की, दरवर्षी दिवाळीच्या दिवशी धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या चल-अचल मालमत्तेत तेरा पटींनी वाढ होते. त्यामुळे या दिवशी लोक सोने आणि चांदीच्या वस्तू देखील खरेदी करतात. (हेही वाचा - Lunar Eclipse 2023: भारतात मुंबई, कोलकाता, गुवाहाटी मधून असं दिसलं चंद्रग्रहण! (Watch Video))
धनत्रयोदशी कधी आहे ?
दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यावर्षी धनत्रयोदशीची तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:57 वाजता संपेल. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष कालात पूजा केली जाते. त्यामुळे धनत्रयोदशी फक्त 10 नोव्हेंबरलाच साजरी केली जाईल. शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचे झाल्यास, या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:02 ते रात्री 08:00 पर्यंत असेल. म्हणजेच तुम्हाला पूजेसाठी सुमारे 1 तास 58 मिनिटे वेळ मिळेल.
धनतेरस पूजाविधी -
- धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष कालात शुभ मुहूर्तावर कुबेर आणि
- धन्वंतरी देवाच्या मूर्तीची उत्तरेकडे स्थापना करावी.
- कुबेर आणि धन्वंतरी देव यांच्यासोबत, माँ लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
- श्रीगणेश, माता लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी देव यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीप प्रज्वलित करा आणि विधीनुसार पूजा सुरू करा.
- सर्वप्रथम सर्व देवी-देवतांना टिळक लावा आणि नंतर धूप, दिवा, फुले, फळे इत्यादी वस्तू अर्पण करा.
- कुबेर देवतेला पांढऱ्या रंगाची मिठाई आणि धन्वंतरी देवतेला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा.
- धनत्रयोदशीच्या पूजेदरम्यान ‘ओम ह्रीं कुबेराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
- भगवान धन्वंतरीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त -
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांसाठी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:35 ते 06:40 पर्यंत असेल. या व्यतिरिक्त जर तुम्ही यावेळी खरेदी चुकवत असाल तर तुम्ही 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:40 ते दुपारी 01:57 पर्यंत खरेदी करू शकता.