Vinayak Chaturthi 2020: भक्तांचे विघ्न हरणारा आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणा-या विघ्नविनाशक गणेशाची पूजाअर्चा करण्यासाठी आजचा विनायक चतुर्थी चा दिवस शुभ मानला जातो. अमावस्या नंतर येणाऱ्या शुल्क पक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. त्याचसोबत पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी दर महिन्यात येते. यात अनेक गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी उपवास करतात. आणि विनायक चतुर्थी दिवशी असलेल्या शुभमुहूर्ताला गणेशाची पूजा करून, त्याला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
गणेश चतुर्थी प्रमाणे विनायक चतुर्थीलाही विशेष महत्व आहे. या दिवशी गणेशभक्त आपल्या आयुष्यात भरपूर सुख-समृद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्या लाडक्या गणेशाची मनोभावे पूजा करतात.
पाहा विनायक चतुर्थीचा मुहूर्त:
या संकट हर्त्या गणेशाची पूजा करण्यासाठी आज सकाळी 10 वाजून 15 मिनिट ते संध्याकाळी 4 वाजून 47 मिनिटांपर्यंत शुभ मुहुर्त असेल. Vinayak Chaturthi 2019: विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छांसाठी खास मराठी WhatsApp Messages, SMS, Wishes आणि शुभेच्छापत्र!
विनायक चतुर्थी चा पूजाविधी:
या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी आणि संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून पोथी वाचावे अथवा नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.
श्री गणेशाची पूजा करताना आणि दुर्वा वाहताना 'ॐ गणपतेय नम:' या मंत्राचा जाप करावा. गणपतीला मोदकांचा नैवेद्य, जास्वंद आणि दुर्वा अर्पण कराव्यात. या दिवशी कोणाबद्दल ही वाईट विचार करु नये. विनायक चतुर्थीला सौभाग्यवती महिलांनी उपवास ठेवावा. चतुर्थीला गणपतीची मनोभावे पूजा करुन तुमच्या मनातील इच्छा त्याच्या समोर व्यक्त केल्यास त्या पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे.