माघ महिन्यामध्ये शुक्ल पंचमीचा दिवस हा माता सरस्वतीचा जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून निसर्गात वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल मिळते त्यामुळे हा दिवस मंगलमय आहे. मग या वसंत पंचमीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना देत त्याचा आनंद द्विगुणित करा. नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. WhatsApp Status, Messages, HD Images, Quotes शेअर करत या दिवसाचा आ नंद द्विगुणित करा.
हिंदू धर्मियांमध्ये लग्न सोहळे, शुभ कामांची सुरूवात केली जाते. दरम्यान महाराष्ट्रात वसंत पंचमीला पंढरपूरामध्ये विठ्ठल -रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा दरवर्षी पार पडतो.
वसंत पंचमीच्या शुभेच्छा
वसंत पंचमी दिवशी सरस्वतीला देखील पांढरी किंवा पिवळी फुलं अर्पण केली जातात. या दिवशी नैवेद्यामध्ये तिला दही दिलं जातं. तर सरस्वती पूजन हे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या नंतर अडीच तासांच्या वेळेमध्ये करण्याची प्रथा आहे.