तुळशी विवाह (Tulasi Vivah) हिंदू संस्कृतीतील (Hindu Sansktriti) एक महत्वाचा सण किंवा परंपरा. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमे (Katik Pournima) पर्यंत हा विधी चालतो. यंदा ४ नोव्हेंबर पासून तर ८ नोव्हेंबर पर्यत तुळशी विवाहाचा (Tulasi Vivah) मुहूर्त आहे. पण आठ नोव्हेंबरला चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) असल्या कारणाने तुलसी विविह ७ नोव्हेंबर पर्यतचं करता येणार आहे. म्हणजे यावर्षी फक्त 4 दिवस तुळशी विवाह करता येणार आहेत. तरी तुळशी विवाह करण्याची शास्त्रयुक्त पध्दती आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुळशी विवाहसाठी तुम्ही कुठली सामग्री वापरायची, तुळशी विवाहचा (Tulashi Vivah) मुहूर्ता याबाबत आम्ही तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहोत. कार्तिकी एकादशीला (Katiki Ekadashi) सर्व तुळशी विवाहाची सुरु होते. आज कार्तिक एकादशी आहे तर तुम्हाला तुमच्या घराच्या तुळशीची विवाह करायचा असल्यास आजपासून तुम्ही करु शकता. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीचं वृदांवन छान सजवतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात. तरी दिवे लावणीच्या वेळानंतर तुळशीचे लग्न लावलं जातं.
तुळशी मातेचा विवाह श्रीकृष्ण देवाबरोबर लावला जातो. कृष्ण हा वर तर तुळशी माता वधु असते. या लग्नादरम्यान बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा असा जयघोष केला जातो. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर छान रांगोळीही काढण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढण्यात येते. (हे ही वाचा:- Tulsi Vivah Mangalashtak: तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं, उत्साहात साजरा करा तुलसीविवाह सोहळा, पाहा व्हिडीओ)
गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते.