Tulsi Vivah Mangalashtak: कार्तिकी एकादशीची लगबग आता सुरु झाली आहे. उद्या म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाहाची धामधुम घराघरात पाहायला मिळते. या वेळेत तुळशीचे लग्न लावले जाते, काही ठिकाणी तुळशीला साडी नेसवून आणि नवरी सारख सजवून लग्न लावले जाते आणि हळदी लावून विधिवत लग्न लावले जाते. लग्नाचे विधी हे मंगलाष्टकशिवाय पूर्ण होणं अशक्य आहे. तुळशीच्या लग्नाला लक्ष्मीच्या रूपात 'तुळस' आणि भगवान विष्णूच्या रूपात 'शाळीग्राम' यांचा विवाह लावला जातो. तुलसी विवाहाची धामधूम महाराष्ट्रात 4 नोव्हेंबर म्हणजे कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तापासून सुरू होणार आहे. उद्या कार्तिक एकादशी आहे. दरम्यान, हिंदू धर्मात मंगलाष्टकला खूप महत्व आहे. हिंदू धर्मातील कोणतेही लग्न मंगलाष्टकशिवाय लावले जात नाही, दरम्यान सर्वांना मंगलाष्टक म्हणता येत नाही, तर चिंता करू नका आम्ही काही मंगलाष्टकचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ लावून तुम्ही तुळशी विवाह सोहळा उत्साहात साजरा करू शकता. चला तर मग [हे देखील वाचा: Tulsi Vivah 2022: तुलसी विवाह महत्त्व, पूजा आणि इतर तपशील घ्या जाणून]
पाहा व्हिडीओ :
तुलसी विवाह मंगलाष्टक
तुळशी पूजा मंगलाष्टक
लग्न म्हणजे सोहळा आणि शुभ प्रसंगी सुंदर रांगोळी काढली जाते. दरम्यान आम्ही काही सुंदर रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत. पाहा व्हिडीओ : Tulsi Vivah Rangoli Designs: तुळशी विवाह सोहळ्याला काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
तुळशी पूजा मंगलाष्टक
तुलसी विवाह मंगलाष्टक
तुलसी विवाह गीते
तुळशीचे विवाह केल्यामुळे घराघरात मंगल कार्य घडते, तुळशी विवाहनिमित्त घरात लगीन घाई बघायला मिळते. घरात छान जेवण बनवले जाते. महिला सुंदर नटतात, दारात आकर्षक रांगोळी काढली जाते, तुळशीचे विधिवत लग्न लावले जाते, असा हा तुळशी विवाहाचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो.