हिंदू धर्मात तुळशी विवाह (Tulsi Vivah) विशेष महत्त्वाचा मानला जातो. या विवाहास देवउठणी एकादशी किंवा देवोत्थान एकादशी असेही म्हणतात. हिंदू पंचागानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी विवाह (Tulsi Vivah 2021 HD Images) साजरा होतो. या वर्षी तुळशी विवाह सोमवारी (15 नोव्हेंबर 2021) या दिवशी आहे. या दिवशी अनेक लोक तुळशीचे लग्न लावतात. तसेच, एकमेकांना शुभेच्छाही देतात. आपणही डिजिटल रुपात शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर त्यासाठी Greetings, Wallpapers, WhatsApp Stickers इथे देत आहोत. जे डाऊनलोड करुन आपण शेअर करु शकता.
सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर पहाटे 05.09 मिनिटांपासून मुहुर्तांना सुरुवात होत आहे. हा मुहूर्त 16 नोव्हेंबरच्या सायंकाळी 07.45 मिनिटांपर्यंत आहे. (हेही वाचा, वाचा: यंदा तुळशी विवाहासाठी तुळशीला कसे सजवाल ? Watch Video.)
सांगितले जाते की, देवउठणी एकादशी दिवशी तुळशी आणि भगवान शाळीग्राम यांची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. वैवाहीक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते. इतकेच नव्हे तर सांगितले जाते की, तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते.