Tulsi Vivah 2020 : यंदा तुळशी विवाहासाठी तुळशीला कसे सजवाल ? Watch Video
Photo Credit : Instagram

आज पासून तुळशीच्या लग्नाचे मुहूर्त सुरु होत आहेत. 26 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह (Tulsi Vivah) करता येईल.तुळशी विवाह म्हणजे घरातील तुळशीचे विष्णूसोबत लग्न लावले जाते. अगदी पारंपारिक पद्धतीने धुमधडाक्यात महाराष्ट्रभर हा सोहळा पार पडतो. जाणून घ्या की तुळशी विवाह ला तुळशीला  कसे सजवले जाते आणि तुळशी विवाह कसा केला जाते. (Tulsi Vivah 2020 Messages: तुळशी विवाहानिमित्त मराठमोळे ग्रीटिंग्स, SMS, Messages, Whatsapp Status शेअर करुन द्विगुणित करा सणाचा आनंद! )

तुळशीला कसे सजवाल?

तुळशीच्या लग्नासाठी तुळशीच्या कुंडीवर लाल ओढणी बांधली जाते.बऱ्याच ठिकाणी साडी ही नेसवली जाते.साडी नेसवण्याची सोपी पद्धत खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये पाहा.

त्यानंतर तुळशीला दागिने घातले जाताता. तिला अगदी नववधू प्रमाणे सजवले जाते. खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी नीट शिकता आणि समजून घेता येतील.

तुलशीला सजवल्यानंतर तुळशी भोवती छान रांगोळी काढतात.रांगोळीच्या डिझाईन या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकाल. Tulsi Vivah Mangalashtak: तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं, लग्नगीतं, आरती गाऊन धूमधडाक्यात साजरा करा तुलसीविवाह सोहळा.

तुळशी विवाह 2020 शुभ मुहूर्त

तुळशी विवाह साधारणपणे संध्याकाळी केला जातो. 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.59 ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.59 पर्यंत तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.

तुळशी विवाह कसा कराल?

विवाहासाठी तुळशीला एखाद्या नववधूप्रमाणे नटवले जाते. उस तुळशीमागे मामा म्हणून खोवला जातो. समोर विष्णू (कृष्ण) ठेवून दोघांचीही पूजा केली जाते. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाट धरुन मंगलाष्टका वाजवल्या जातात. जमलेले लोक अक्षता टाकतात. त्यानंतर विवाहपूर्तीच्या माळा घातल्या जातात. त्यानंतर दिवाळीच्या फराळाची मेजवानी असते. फटाके फोटून आनंद साजरा केला जातो.