Tulsi Vivah 2020 Messages: कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे 4 दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. मात्र, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात आणि पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. यंदा 26 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास सुरुवात होत आहे.
तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह केला जातो. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावले जाते. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. यंदा तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला तुळशी विवाहानिमित्त मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील तुळशी विवाहाचे संदेश नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा -Vivah Shubh Muhurat 2020: यंदा तुळशी विवाहानंतर सरत्या वर्षाला निरोप पूर्वी लग्नबेडीत अडकण्यासाठी पहा नोव्हेंबर, डिसेंबर मधील विवाहाचे मुहूर्त!)
अंगणात तुळस,
आणि शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
आज सजली तुळस
शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचे
मोहरले पान पान..
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
अंगणात उभारला विवाह मंडप
त्यात सजली ऊस आणि
झेंडूंच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज दिवस आहे खास
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !
हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. तुलसी विवाह हे एक व्रत असून हे व्रत केल्याने कन्यादानाचे पुण्य लाभते.