Gudi Padwa 2025 Mehndi Designs: हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष सुरू होते. हिंदू नववर्ष, प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजरे केले जाते. गुढी पाडव्याला भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये उगादी म्हणूनही ओळखले जाते. गुढी पाडवा (Gudi Padwa 2025) हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. गुढी या शब्दाचा अर्थ विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेला येणाऱ्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने लोक त्यांच्या घरात विजय ध्वज म्हणून गुढी सजवतात आणि हा दिवस उत्साहाने साजरा करतात.
गुढीपाडवा साजरा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते. गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नवर्षाला (Marathi New Year 2025) सुरुवात होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत गुढीपाडव्याचा सण खूपचं खास असतो. गुढीपाडव्यासाठी महिला हातांवर मेहंदी काढतात. तुम्ही देखील गुढीपाडव्यासाठी मेहंदी डिझाईन्स शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि सोप्या मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील व्हिडिओ पाहून तुमच्या हातावर गुढीपाडव्यासाठी खास मेहंदी डिझाईन्स (Gudi Padwa 2025 Mehndi Designs) काढू शकता. (हेही वाचा - गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा नवं वर्ष साजर. )
गुढी पाडवा मेहंदी डिझाईन्स व्हिडिओ -
इंग्रजी कॅलेंडरनुसार, यावर्षी गुढी पाडव्याचा सण 30 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी, सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर, विजयाचे प्रतीक म्हणून घरात सुंदर गुढी ठेवल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. गुढीपाडव्याचा सण कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो.