Gudi Padava 2024 Rangoli Designs

Gudi Padwa 2024 Rangoli Designs: हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुध्द प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या गुण्या गोविंद्याने साजरी केले जाते. वेद ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, साडेतीन मुहुर्तांपैकी हा पहिला दिवस असतो. यंदा हा गुढीपाडव्याचा सण हा ९ एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी महराष्ट्रात घरोघरी नवीन वस्तू खरेदी केली जातात. शुभ दिवस मानला जाता म्हणून काही जण नव्या व्यवसायाला प्रारंभ करतात. तसेच काही जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. दारी उभारलेली ही गुढी विजय आणइ समृध्दीचे प्रतीक असते असे मानले जाते. त्याच बरोबर दारासमोर रांगोळी देखील काढली जाते. घरला फुलाफुलांनी सजवले जाते. तर गुढी पाडव्याच्या निमित्ताने घराच्या दारात सहज सोप्या रांगोळ्या कशा काढाल हे नक्की पहा. (हेही वाचा- गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा चैत्र पाडव्याचं स्वागत