Shiv Jayanti Tithi 2021 Wishes in Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा!
Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

Shiv Jayanti Tithi 2021 Wishes: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म दिन हा महाराष्ट्रात 'शिवजयंती' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक मराठ्यांचा ऊर अभिमानाने भरावा असा हा दिवस.. ज्या दिवशी शिवछत्रपतींनी या भूमीवर जन्म घेतला. 19 फेब्रुवारी दिवशी शिवरायांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. मात्र महाराष्ट्रात काही जण तिथीनुसारही शिवजयंती साजरी करतात. यंदा तिथीनुसार ही शिवजयंती 31 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शिवरायांना मानवंदना देण्यासाठी तुम्ही मेसेजेस, ग्रिटिंग्सद्वारे शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र आपण घरात राहून शिवछत्रपतींच्या फोटोला अभिवादन करुन देखील या दिनाचा मान राखू शकता. तसेच आपल्या मित्रपरिवाला आणि कुटूंबाला तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करु शकता.

स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर,

ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर

त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे

ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य

पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य

स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार

शिवजयंती दिनी करु त्या शिवछत्रपतींचा जयजयकार

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हेदेखील वाचा- Shiv Jayanti 2021 Guidelines: शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जाहीर

Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा!

Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो,

रयतेसाठी देव होता तो,

शत्रूसाठी तळपती आग होता तो,

मुघलांचा बाप होता तो

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून

अभिमानाने भरून जाई छाती

प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात

वसतात राजे शिवछत्रपती

शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा!

Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध संस्था आणि सरकार कडून पुढे शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याला सुरूवात झाली. या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामधून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तर साहसी कथा सांगून त्यांचे विचार रूजवण्याचे प्रयत्न केले जाते.