Shiv Jayanti 2021 Guidelines: शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जाहीर
Shivaji Maharaj Birth Anniversary (Photo Credits: Wikimedia Commons)

Shiv Jayanti 2021 Guidelines: कोरोना व्हासरच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच धार्मिक आणि सांस्कृति कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात यावे अशा सुचना सुद्धा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा ही दिला आहे. अशातच आता होळी नंतर आता शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 31 मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

शिवजयंतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर विविध ठिकाणी रॅलींसह कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदाची कोरोनाची परिस्थिती पाहता शिवजयंती साधेपणाने साजरी करावी असे सांगण्यात आले आहे. तसेच गाईडलाईन्स सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.(Happy Holi Messages in Marathi: होळी च्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन या सणाच्या निमित्ताने वाईट विचारांचे करा दहन!)

-शिवप्रेमी गड, किल्ल्याांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आदल्या दिवशी रात्री 12 वाजता साजरी करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या कारणामुळे गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

-विविध टिकाणी साजरे करण्यात येणारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यास परवानगी नसणार आहे. मात्र कार्यक्रमांचे वर्च्युअली प्रक्षेपण दाखवावे असे सांगण्यात आले आहे.

-प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यास बंदी असणार आहे. तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यास परवानगी असणार आहे. परंतु त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

-शिवजयंतीच्या दिवशी आरोग्याविषयक उपक्रमांचे आयोजन करुन नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

राज्यात गेल्या 24 तासात 36,902 जणांना कोरोनाची लागण झाली असून 17,019 जणांना डिस्चार्ज दिला गेला. तर 112 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल आहे. त्यामुळे आता राज्यात एकूण 26,37,735 कोरोनाचे रुग्ण असून 23,00,056 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण 53,907 जणांचा बळी गेला आणि आता 2,82,451 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे.