Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes In Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची यंदा 391 वी जयंती आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवरायांचा रायगडावर जन्म झाला. महाराष्ट्रात शिव जयंती (Shiv Jayanti) नेमकी कधी? यावर मतमतांतर आहेत. काही जण तिथीनुसार तर काही जण तारखेनुसार महाराजांची जयंती साजरी करतात पण प्रत्येक शिवप्रेमींमध्ये राजांबद्दल आदर तितकाच असतो. यंदा कोविड 19 संकटामुळे महाराष्ट्रात शिवप्रेमींना साधेपणाने यंदाची 19 फेब्रुवारीची शिव जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक शिवप्रेमीला यंदा तुम्हांला भेटून शुभेच्छा देऊ शकत नसलात तरीही यावर्षी सोशल मीडियात व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), मेसेजेस (Messages), GIFs, SMS, WhatsApp Stickers, शिव जयंती स्टेटस द्वारा शुभेच्छा देत शिवजयंतीचा आनंद द्विगुणित करा.
शिवाप्रेमी दरवर्षी शिवजयंतीचा औचित्य साधत रायगडाला भेट देतात, राज्यातील विविध गडांवर साफ सफाईचं, डागडुजीचं काम हाती घेतात पण यंदा राज्यात अनेक ठिकाणी जमावबंदी लागू असल्याने गड किल्ल्यांवर प्रत्येकाला जाता येणार नाही पण यावर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुमोल विचार, धगधगता इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा. यानिमित्ताने त्यांचे विचार, पोवाडे गाऊन सुरक्षित राहत वेगळ्या अंदाजात शिवजयंती साजरी करायला विसरू नका. हेदेखील वाचा- Shiv Jayanti 2021 Date: 19 फेब्रुवारी दिवशी साजरी होणार शिवजयंती 2021; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व.
शिवजयंतीच्या शुभेच्छा
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला शिवबा होता
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठा राजा महाराष्ट्राचा,
सारे म्हणती त्यास माझा
आजही गौरवगीते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवजयंती व्हॉट्सअॅप स्टिकर्स
शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी व्हॉट्सअॅप स्टिकर्स तुम्ही डाऊनलोड करून ती देखील शेअर करू शकता. यामध्ये कस्टामाईज्ड व्हॉट्सअॅप स्टिकर्स बनवण्याचा देखील पर्याय आहे. तुम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवायची असतील तर ती गूगल प्ले स्टोअर वरून देखील डाऊनलोड करता येऊ शकता.