Shiv Jayanti 2021 Messages In Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा शिवछत्रपतींचा जन्मदिवस!
सामाजिकतेचे भान ठेवून तुम्ही आहे त्या ठिकाणी संदेशाच्या माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन ती साजरी करू शकता.
Shiv Jayanti Wishes In Marathi: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, तर मुघलांवर आलेले अस्मानी संकट होते. आपल्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता, लढवय्येपणा, शूरवीरपणा यांसारख्या गुणांमुळे ते रयतेचे राजे झाले. अशा या पराक्रमी राजाच्या जन्म झाला 19 फेब्रुवारी रोजी. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'शिवजयंती' (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मोठ्य संख्येने एकत्र न जमता अगदी साधेपणाने तुम्ही ही शिवजयंती साजरी करू शकता. मात्र तुम्हाला दरवर्षी प्रमाणे हा उत्सव साजरा करता आला नाही तरी तुम्ही हताश न होता मेसेजेस (Messages), कोट्स (Quotes), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
शिवजयंती साजरा करणे म्हणजे एकत्र जमूनच ती साजरी केली जावी असे नाही. सामाजिकतेचे भान ठेवून तुम्ही आहे त्या ठिकाणी संदेशाच्या माध्यमातून एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन ती साजरी करू शकता.
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे सुख ही एकच होती मनी आस
मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा
असा वाघिणीचा होता तो छावा
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा

'जय शिवराय' या उद्घोषाने
सळसळते मराठ्यांचे रक्त
माणसातल्या 'या' देवाचे
आम्ही सारे आहोत शिवभक्त
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
हेदेखील वाचा- Shiv Jayanti 2021 Date: 19 फेब्रुवारी दिवशी साजरी होणार शिवजयंती 2021; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती
पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

श्वासात रोखूनी वादळ
डोळ्यांत रोखली आग
देव आमचा छत्रपती
एकटा मराठी वाघ
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जिजाऊंच्या पोटी घेतला ज्यांनी जन्म
त्यांची शूरवीरता कुणीच विसरणार नाही आजन्म
स्वराज्य ही एकच भावना होती ज्यांची मरणाअंती
सर्वांनी मिळून साजरी करु या शिवजयंती
तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा!!

मग विचार कसला करताय, ताबडतोब हातात मोबाईल घेऊन एकमेकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवजयंतीच्या शुभेच्छा द्या. मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा दिवस साजरा करा. बोला जय शिवराय!
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2021 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

