![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/12/6-Happy-New-Year-2024-Messages-marathi-380x214.jpg)
Happy New Year 2024 Messages: नवीन वर्ष 2024 लवकरच सुरू होणार आहे. नवीन वर्ष म्हणजे नवे स्वप्न, नवीन ध्येय, नवीन आकांक्षा. तुमच्या 2023 वर्षाबद्दल काही खूप चांगल्या आठवणी असतील. पण नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे हे अद्याप तुम्हाला माहित नाही. आशावादी राहण्याची, नवीन स्वप्ने निर्माण करण्याची आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वर्षासाठी नवीन संकल्प करण्याची ही वेळ आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही उत्सुक असाल, तर आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी WhatsApp Status, Wishes, Wallpapers, Quotes घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या ईमेज डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.
नवीन वर्षासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स असतात. तुम्हाला तुमचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांचे नवीन वर्षानिमित्त अभिनंदन करायचे असेल तर तुम्ही खालील शैलीत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा संदेश पाठवू शकता. (हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास मराठी Wishes, Wallpapers, WhatsApp Status, Quotes शेअर करून द्या नववर्षाच्या शुभेच्छा!)
प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…
पण या नव्या वर्षात तुम्हाला सर्व काही मिळो
जे तुम्हाला मनापासून हवं आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/12/1-Happy-New-Year-2024-Messages-marathi.jpg)
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
Happy New Year!!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/12/2-Happy-New-Year-2024-Messages-marathi.jpg)
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/12/3-Happy-New-Year-2024-Messages-marathi.jpg)
आज वर्षाचा शेवटचा दिवस, खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं, अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली, खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो…
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/12/4-Happy-New-Year-2024-Messages-marathi.jpg)
जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/12/5-Happy-New-Year-2024-Messages-marathi.jpg)
प्रत्येकजण नवीन वर्षात स्वतःला सुधारण्याचा विचार करतो. प्रत्येकजण 31 डिसेंबरची रात्र एन्जॉय करतो आणि जुन्या वर्षाचा आनंदाने निरोप घेतो. नवीन वर्षात पार्टीसोबतच नवीन वर्षाच्या शुभेच्छा ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही वरील संदेश पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा पाठवू शकता.