Happy New Year 2023 Messages: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास मराठी Wishes, Wallpapers, WhatsApp Status, Quotes शेअर करून द्या नववर्षाच्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Quotes शेअर करून नववर्षाच्या शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील फोटोज डाऊनलोड करू शकता.
Happy New Year 2023 Messages in Marathi: 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. लवकरच नवीन वर्ष 2023 सुरू होणार आहे. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि भरभराटी घेऊन येईल अशी आशा आहे. नववर्षानिमित्त मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश पाठवण्याची परंपरा आहे. नववर्षानिमित्त तुम्ही खास मेसेज पाठवून तुमच्या जवळच्या व्यक्तींना नवीन वर्षासाठी शुभेच्छाही देऊ शकता.
तुम्ही नवीन वर्षानिमित्त आपल्या मित्र-परिवारास मोबाईलद्वारे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेजवर मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी नववर्षानिमित्त काही खास मेसेज घेऊन आलो आहोत. हे संदेश पाठवून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Happy New Year 2023 Wishes in Advance: नवीन वर्षानिमित्त WhatsApp Status, Messages, SMS शेअर करत आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा!)
नववर्षाच्या मराठी शुभेच्छा 2023 ( Happy New Year Shubhechha in Marathi)
दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट!
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
दुःख सारी विसरून जावू, सुख देवाच्या चरणी वाहू
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवी आशा
तुमच्या आयुष्याला मिळो
पुन्हा एक नवी दिशा
नवी स्वप्न, नवं क्षितिजं
सोबत माझ्या नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला नवीन वर्षाचे स्वागत करुया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या खास शुभेच्छा, नव वर्षाच्या शुभदिनी…
नूतन वर्षाभिनंदन!
वरील मेसेजेस पाठवून तुम्ही नववर्षाच्या खास शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकता. येणार नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

