Happy New Year 2023 Wishes in Advance: सर्व प्रथम, तुम्हा सर्वांना नवीन वर्ष 2023 च्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन उत्साहाने भरलेले असेल. त्यामुळे नवीन वर्षाचे नव्या पद्धतीने स्वागत केले पाहिजे. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा मित्रमंडळींसोबत असाल, तर ते खास बनवण्यात कोणतीही कसर सोडू नका. गेल्या वर्षी काय केले किंवा करू शकलो नाही हे विसरून नवीन वर्षात स्वतःला काही नवीन वचने द्या. गतवर्षातील कटुता आणि वाईट क्षण एक धडा म्हणून लक्षात ठेवून नवीन वर्षाच्या आनंदात सहभागी व्हा. भारतातील जवळजवळ सर्व धर्मांमध्ये नवीन वर्ष 1 जानेवारी ऐवजी वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाते. गुजरातमध्ये दिवाळीनंतरचा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो, तर पंजाबमध्ये नवीन वर्ष बैसाखीला साजरे केले जाते. महाराष्ट्रात, नवीन वर्ष मार्च-एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला साजरे केले जाते, तर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील लोक देखील बैसाखीच्या आसपास नवीन वर्ष साजरे करतात.
नवीन वर्षानिमित्त WhatsApp Status, Messages, SMS शेअर करत आपल्या प्रियजनांना खास अॅडव्हान्स शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Mumbai Christmas 2022 Celebration: मुंबई मध्ये Marine Drive परिसरात नागरिकांनी रस्त्यावर नाचून, गाऊन साजरा केला सण (Watch Video))
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
Happy New Year in Advance!
2023 हे येणारे नववर्ष
आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेवून येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
Happy New Year in Advance!
हे आपल नातं असंच राहु दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2022 वर्षाचा
2023 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
Happy New Year in Advance!
नवीन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Happy New Year in Advance!
इस्लामिक कॅलेंडरमध्ये नवीन वर्ष मोहरम म्हणून ओळखले जाते. पण आता 1 जानेवारीला नववर्ष साजरे करण्याची नवी प्रथा जवळपास देशभर सुरू झाली आहे. 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात. त्याचे नाव पोप ग्रेगरी यांच्या नावावरून ठेवण्यात आले. 15 ऑक्टोबर 1582 पासून लागू झालेले हे कॅलेंडर आता जगभर प्रसिद्ध आहे. याच आधारावर आता 1 जानेवारीला नववर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे.