lakshmi Poojan- File Image

Lakshmi Pujan 2023 Message In Marathi:  दिवाळी सुरु होताच घरात एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं. दिवाळीत लक्ष्मी पूजनाला फार महत्त्व असतं. हिंदू धर्मात असं मानलं जात की या दिवशी लक्ष्मी मा आपल्या घरी प्रकट होते. आपल्याला आशिर्वाद देते. त्यामुळे दिवाळीपूर्वी  घरात साफसफाई केली जाते. लक्ष्मी पूजनच्या दिवशी नवीन कपडे घालून संध्याकाळी हा सण साजरा केला जातो. लक्ष्मी पूजनचा दिवस हा शुभ मानला जातो. या दिवशी हिंदू धर्मातील लोक काही तरी नवीन खरेदी करत अथवा गुंतवणूक करतात. हिंदू पूराणात दिलेल्या माहितीनुसार या दिवशी समुद्र मंथनावेळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला माता लक्ष्मी प्रगट झाली होती. त्यामुळे प्रत्येक घरात हा सण कुटुंबिय एकत्र येऊन साजरी करतात. यादिवशी तिन्ही सांजेच्या वेळीस गणेश, कुबेर, सरस्वती आणि माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. घरात सुख, समृध्दी लाभण्यासाठी, सुदृढ आरोग्य, ऐश्वर्यासाठी देवांची पूजा केली जाते. मग या सणाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना  Instagram Messages, WhatsApp, Facebook Messages, Quotes, Greetings द्वारा शेअर करा.

लक्ष्मीपूजनाच्या  निमित्ताने, आम्ही तुमच्यासाठी मंगलमय शुभेच्छा आणि संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत शेअर करू शकता.

 हेही वाचा- लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा SMS, Greetings, GIFs, Images, Whatsapp Stickers च्या माध्यमातून देऊन तुमच्या आप्तलगांची यंदाची दिवाळी करा खास

  1.  सुख आणि समृद्धी घेउनी आगमन

    व्हावे लक्ष्मीचे

    दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे

    भविष्य उद्याचे

    लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा!

Lakshmi Poojan File Image

2. लक्ष्मी आली सोनपावली,                                                                                                                   उधळण झाली सौख्याची

धन-धान्यांच्या राशी भरल्या

घरी नांदू दे सुख-समृद्धी!

लक्ष्मी पूजेच्या सोनेरी हार्दिक शुभेच्छा!

Lakshmi Poojan File Image

3. चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला

दारातला दिवा आकाशात खुललेला

अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात

लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात

Lakshmi Poojan File Image

4. समृद्धी यावी सोन पावली                                                                                                                                उधळण व्हावी सौख्याची

भाग्याचा सर्वोदय व्हावा                                                                                                                                     वर्षा व्हावी हर्षाची

लक्ष्मी पुजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Lakshmi Poojan File Image

5. लक्ष्मी पुजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

Lakshmi Poojan File Image

लक्ष्मी पुजेच्या दिवशी हिंदू धर्मात घरात नवी केरसुनी घेतली जाते. तिची हळद - कुंकूने पूजा देखील केली जात.या दिवशी दुकानदार आणि व्यापारी आपल्या दुकानाची आणि आपल्या महत्त्वात्या साहित्यांची पूजा करतो. भारतात काही ठिकाणी तर लहान मुलींची पूजा केली जाते त्यांना देवीचे पूज रुप समजून त्यांना नवीन भेट वस्तू किंवा पैसे दिले जाते.