
World Printing Day 2023 Messages: दरवर्षी 24 फेब्रुवारी म्हणजेच जोहान्स गटेनबर्ग यांचा जन्मदिवस हा जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. जोहान्स गटेनबर्ग हा एक जर्मन लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक होता. गटेनबर्गने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली.त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांति घडून आली. जोहान्स गटेनबर्ग लिहिलेले गटेनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापिल पुस्तक मानले जाते.
जर्मनीतील जोहान्स गटेनबर्गने सन 1455 मध्ये मुद्रणकलेचा शोध लावला. त्याच्या स्मरणार्थ 24 फेब्रुवारी हा गटेनबर्ग यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मुद्रणदिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक मुद्रण दिनानिमित्त Images, Wishes, WhatsApp Status शेअर करून खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग
यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या
जागतिक मुद्रण दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

आज जागतिक मुद्रण दिन...
सर्वांना जागतिक मुद्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग
यांचा जन्मदिवस मुद्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो...
जागतिक मुद्रण दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

मानव जातीचे प्रबोधन वेगाने घडवून आणणारे
तंत्रज्ञान म्हणजे मुद्रण कला...
जागतिक मुद्रण दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग
यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
जागतिक मुद्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुद्रण कलेमुळे साहित्य प्रकाशनाला वेग आला. मुद्रण कलेच्या शोधामुळे मानवी जीवनातील क्रांतिकारी शोधाच्या ज्ञान प्रसाराला गती मिळाली. गुटेनबर्ग यांनी अक्षराचे सुटे खिळे बनविण्याचा शोध लावला.