Tulsi Vivah 2023 Wishes in Marathi: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते. असे म्हटलं जात की ज्या घरात तुळशीवर जल अर्पण केले जाते त्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. याशिवाय संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे देखील खूप फलदायी मानले जाते. तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. विशेषत: कार्तिक महिन्यात तुळशीपूजेला विशेष महत्त्व आहे.
कार्तिक महिना भगवान नारायणांना अतिशय प्रिय आहे. तुळशी विवाहाचा सणही याच महिन्यात येतो. अशा स्थितीत या महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो. यंदा 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह होणार आहे. तुळशी विवाह निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास तुळशी विवाहाच्या शुभेच्छा देऊ शकता. खालील Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे तुम्ही या मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Tulsi Vivah Mangalashtak in Words: तुळशीचं लग्नं लावताना बिनचूक मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे पहा त्याचे शब्द!)
ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
नमस्तुलसि कल्याणी
नमो विष्णुप्रिये शुभे
नमो मोक्षप्रदे देवी
नम: सम्तप्रदायिके
तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अगंणाला शोभा नाही
जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्र
मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंद
चला वाटूया अक्षता या खास क्षणासाठी
सजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकी
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हिंदू दिनदर्शिकेनुसार, तुळशी विवाहाचे आयोजन दरवर्षी प्रदोष काळात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केले जाते. या दिवशी तुळशीमातेचा विवाह शालिग्रामशी होतो. यावेळी तुळशी विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त तयार केले जात आहेत. या दिवशी तुळशी विवाहाची वेळ सायंकाळी 5.25 पासून सुरू होईल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, सिद्धी योग देखील आहे.