
Ganesh Visarjan 2023 Wishes: हिंदू धर्मात गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) 10 दिवसांत श्रीगणेशाची आराधना केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात, असा समज आहे. गणपती विसर्जन गणेश चतुर्थीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला केले जाते. असे मानले जाते की या दिवशी बाप्पा आपल्या घरी परत जातात. या वर्षी गणेश विसर्जन 28 सप्टेंबर 2023, गुरुवार रोजी होणार आहे. काही लोक दीड, तीन, पाच किंवा सातव्या दिवशीही गणपतीचे विसर्जन करतात.
ज्याप्रमाणे गणपतीचे उत्साहात स्वागत केले जाते. त्याप्रमामणेचं गणरायाला निरोपही दिला जातो. या दिवशी गणेश भक्त एकमेकांना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गणेश विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2023 Slogan & Status: गणपती विसर्जन निमित्त खास WhatsApp Status, Quotes, HD Images, Wallpapers शेअर करून द्या 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप!)
आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना...

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
!!गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!!

गुरुवार 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त सकाळी 06.11 ते 07.40 पर्यंत असेल. संध्याकाळी गणेश विसर्जन 04:41 ते 09:10 या शुभ मुहूर्तावर करता येईल. श्रीगणेशाचे विसर्जन करण्यापूर्वी विधीप्रमाणे श्रीगणेशाची पूजा करावी. पूजेदरम्यान श्रीगणेशाला लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, मोदक, सुपारी, सुपारी, धूप-दीप इत्यादी अर्पण करावे. कुटुंबासह गणपतीची आरती करावी. या दिवशी हवन करणे देखील खूप शुभ मानले जाते.