
Ganpati Visarjan 2023 Slogan Messages: गणेश चतुर्थीपासून 10 दिवस चालणाऱ्या गणेश महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. विधीनुसार दहा दिवस दररोज गजाननजींची पूजा केली जाईल. त्यानंतर 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होईल. याशिवाय अनेकजण दीड दिवस, तीन दिवस आणि अगदी पाच दिवस गणेशाची स्थापना करतात. हिंदू धर्मात गणपती उत्सावाला अतिशय महत्त्व आहे. असं मानले जाते की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे पूजन केल्यास सर्व कार्य सिद्धी होतात.
गणेश चतुर्थी उत्सव भगवान गणेशाच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या विशेष दिवशी गणेशाची आराधना केल्याने सर्व दु:ख दूर होतात आणि साधकाला शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. अनेकजण आपल्या-आपल्या पद्धतीने दीड, तीन, पाच किंवा दहा दिवसाचा गणपती बसवतात. आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या निमित्ताने तुम्ही WhatsApp Status, Quotes, HD Images, Wallpapers शेअर करून 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप देऊ शकता.
निरोप देतो देवा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या...!!!

आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या...!!!

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...!!!

रिकामं झालं घर, रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास
निघाला आमचा लंबोदर!
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...!!!

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना,
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...!!!

ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच
जल्लोषात आज त्याला निरोप देणार !!
मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार !!!
गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी अजून लवकर या

आज सायंकाळी 7.49 वाजल्यापासून रात्री 12.15 वाजेपर्यंत दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करता येणार आहे. आज दीड दिवसाच्या लाडक्या गणपतीला निरोप दिला जाणार आहे.