
Sant Dyaneshwar Maharaj Samadhi Wishes 2020: महाराष्ट्रातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वरी संजीवनी समाधीचा सोहळा आज (13 डिसेंबर) पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठल पादुकांसह भक्त पुंडलिक आणि संत नामदेव यांच्या पादुका आळंदीत प्रस्थान करतात. आषाढ यात्रेच्या वेळी सर्व संतांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणी दर्शनासाठी येतात. परंतु कार्तिकी वैद्य एकाशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी सोहळ्यानिमित्त विठ्ठल स्वत: उपस्थितीत राहतो असे मानले जाते.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधि निमित्त वारकरी आळंदीत मुक्काम करतात. तर कार्तिकी वद्य अष्टमीच्या दिवशी आळंदीमध्ये या तिन्ही दिड्यांना फार महत्व असते. तर यंदाच्या कोरोना व्हायरची परिस्थिती पाहता संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनानिमित्त शुभेच्छा, Images शेअर करून साजरा हा सण साजरा करता येऊ शकतो.(Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2020: संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल, भक्त पुंडलिक, संत नामदेव पादुकांचे आळंदीकडे बसने प्रस्थान)






आळंदी येथे पार पडणारा संजीवन समाधी सोहळ्याचे यंदा 724 वे वर्ष आहे. सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी आणि कोरोनाची परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासानाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधीसाठी प्रत्येक वर्षाला आळंदीत 4 ते 5 लाख भाविक येत असतात.