
आज 27 जून संकष्टी चतुर्थी चा दिवस. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.या वेळी रविवारी गणेश संकष्टी चतुर्थी आल्यामुळे रविवती संकष्टी चतुर्थीचा योग तयार होत आहे. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.प्रत्येक गणपतीच्या मंदीरात हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. (Sankashti Chaturthi June 2021: कधी आहे जून महिन्यातील संकष्टी चतुर्थी ? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी )
संकष्टी चतुर्थीच्या या शुभ दिवशी गणरायाच्या भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी ही खास Wishes, WhatsApp Status, Facebook Image सोशल मिडीयाच्या माध्यमांतून नक्की पाठवा.





दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवला जातो. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे.