हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या मंदिरात हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. यंदा जून महिन्यातील संकष्टी 27 जून,रविवारी साजरी केली जाणार आहे. या वेळी रविवारी गणेश संकष्टी चतुर्थी आल्यामुळे रविवती संकष्टी चतुर्थीचा योग तयार होत आहे. चला जाणून घेऊया गणेश संकष्टी चतुर्थीची शुभ वेळ आणि पूजा करण्याची पद्धत. (Happy Sankashti Chaturthi 2019 Wishes: संकष्टी चतुर्थी निमित्त ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या मंगलमयी शुभेच्छा! )
गणेश संकष्टी चतुर्थीसाठी शुभ वेळ:
आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी: 27 जून 2021
पूजेची शुभ वेळः दुपारी 3:54 ते 28 जून दुपारी 02:16 पर्यंत
संकष्टीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ: 10 वाजून 03 मिनिटांनी
संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची पूजा कशी करावी?
चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर गणराची मुर्ती/प्रतिमा मांडावी. चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढून हळद-कुंकू वाहावे. मुर्ती-प्रतिमेवर दूध-पाण्याचा अभिषेक करुन हळद कुंकू, अक्षता वाहाव्या. फुलं, दुर्वा, शमीची पाने वाहावी. दिवा, अगरबत्ती ओवाळा. पुजेसमोर पानाचा विडा ठेवून त्याचीही पूजा करावी. पाच फळे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.संकष्टी चतुर्थी दिवशी गोडाधोडाचे जेवण करुन नैवेद्य दाखवला जातो. विशेष करुन मोदकांचा नैवेद असतो. ते शक्य नसल्यास एखादा गोडाचा पदार्थ केला जातो. त्यानंतर आरती करुन आकाशातील चंद्राचे दर्शन घेऊन मग उपवास सोडला जातो.