
Sankashti Chaturthi Marathi Wishes: आज संपूर्ण महाराष्ट्रात संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2019) उत्साहात साजरी होत आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा करून दिवभर उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशभक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणाऱ्या संकष्टीच्या दिवशी गणेशभक्त बाप्पाची पूजा करतात. या दिवशी दिवसभर उपवास करुन रात्री चंदोदयानंतर गणेशाला नैवेद्य दाखवून अन्नग्रहण केले जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास विघ्नहर्ता गणेशा भक्तावर प्रसन्न होतो, असं मानलं जातं. (हेही वाचा -Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थीनिमित्त 'अशी' करा पूजा, जाणून घ्या श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय)
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात श्री गणेशाची पूजा करुनच केली जाते. प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी 'संकष्टी चतुर्थी' व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सुख-समृद्धी, शांती लाभते. तसेच श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण विधीने श्रीगणेशाची पूजा करणे आवश्यक आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला तसचं तुमच्या ओळखीच्या गणेश भक्ताला या दिवसाच्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खालील Images नक्की कामी येतील...(हेही वाचा - Sankashti Chaturthi November 2019: संकष्टी चतुर्थी दिवशी असे करा श्रीगणेशाचे व्रत; काय आहे आजची चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या सविस्तर)
संकष्टीच्या चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा -
मोरया गणराया, साऱ्या भक्तांचे विघ्न हराया आला
संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा



संकष्टीच्या चतुर्थीच्या हिंदीतून शुभेच्छा -
देखकर तेरा मनमोहक चेहरा
सुध बुध खो जाता है
मन करता है जीवन भर,
तेरी भक्ति में खो जाऊं

सभी शुभ काज में पहले पूजा तेरी
तुझ बिन कोई काम सफल न हो
अरज सुन मेरी
हैप्पी संकष्टी चतुर्थी!

संकष्टी चतुर्थी के शुभ अवसर पर
बाप्पा करें सभी भक्तों की,
मनोकामनाएं पूरी
हैप्पी संकष्टी चतुर्थी!

सभी श्री गणेश भक्तों को
संकष्टी चतुर्थी की शुभकामनाएं
हैप्पी संकष्टी चतुर्थी!

संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवसभराचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आज पंचांगानुसार, रात्री 8.23 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे. तुम्हीही गणेशभक्त असाल तर, या चतुदर्शीला मनोभावे बाप्पाची पूजा करा, असं केल्याने बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील.