हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवसाचा आहे. यंदा ही फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल दिवशी आहे. त्यामुळे शिवप्रेमी तिथीनुसार छत्रपती संभाजी राजेंच्या पुण्यतिथी (Sambhaji Maharaj Punyatithi) निमित्त Images, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करू शकतात. छत्रपती संभाजी राजे भोसले यांना कैद करून औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 11 मार्च 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी संभाजी महाराजांवर वाघ नखाने वार करण्यात आला आणि भीमा नदीच्या काठावर तुळापूर येथे कुऱ्हाडीने शिरच्छेद करून ठार मारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ शिवप्रेमी आवर्जुन एकत्र येतात.
संभाजी स्वतः एक महान राजा आणि योद्धा म्हणून ओळखले जात होते. अवघे 2 वर्षांचे असताना आईच्या मायेचं छत्र हरवल्यानंतर जिजाऊंनी संभाजीराजेंना घडवलं. त्यामुळे शिवबांप्रमाणे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज देखील राजमाता जिजाबाईंच्या संस्कारांमध्ये वाढले. त्यांच्या शौर्याच्या गाथा आजच्या दिवशी नक्की पुढल्या पिढी पर्यंत पोहचवा.
छत्रपती संभाजी राजेंना अभिवादन
पाहुनी शौर्य तुजपुढे
मृत्यूही नतमस्तक जाहला
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि त्यांचा सल्लागार कवी कलश यांना इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला नकार दिला आणि नरक यातना स्वीकारत मृत्यू पत्करला. त्यांच्या या समर्पणाला कोटी कोटी प्रणाम!