Sambhaji Maharaj Punyatithi 2020 Images: संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळे संदेश, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेअर करुन आठवूया शंभूराजांचे शौर्य!
Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 HD Images (Photo Credits: File Image)

Sambhaji Maharaj Balidan Din 2020 HD Images: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj)  पुत्र आणि अखंड स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची आज, 11 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. औरंगजेबाच्या (Aurangjeb) जुलमी छळाला सलग 40 दिवस न झुकता तोंड देणाऱ्या शंभूराजांचे शौर्य आजच्या काळात विचार करुनही अंगावर शहारे आणते. आजही आपल्या मातीसाठी जीवाची पर्वा न करणारे शंभू राजे आजही अनेक लढवय्यांचे श्रद्धस्थान आहेत. 400 वर्षांनंतरही आपली जागा प्रत्येक हृदयात टिकवून ठेवणारा हा राजा खरोखरच शिवाजी महाराजांचा लेक म्ह्णून शोभतो. आज संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या ओळखीतील प्रत्येकाला आपण हे काही मराठमोळे संदेश,  Images, Whatsapp Status सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून या थोर राजाच्या कर्तबगारीचे स्मरण करूयात. यासाठी खाली दिलेले काही मोजकेच आणि निवडक शब्दातील फोटो डाउनलोड करून तुम्ही शेअर करू शकता.

संभाजी महाराज पुण्यतिथी 2020 विशेष Images

Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 HD Images (Photo Credits: File Image)
Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 HD Images (Photo Credits: File Image)
Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 HD Images (Photo Credits: File Image)
Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 HD Images (Photo Credits: File Image)
Sambhaji Maharaj Punya Tithi 2020 HD Images (Photo Credits: File Image)

संभाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणीसाहेब सईबाई यांच्या पोटी 14 मे इ.स. 1656 रोजी झाला होता, शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात त्यांनी 9 वर्षे स्वराज्याचा कारभार रक्षला होता. शिवबाचा पुत्र, थोर लढवय्या, आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!