महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. अनेक महान संत-महंतांच्या शिकवणीतून महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण झाली आहे. रामदास स्वामी (Ramdas Swami) या संत परंपरेमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. दासबोध ते मनाचे श्लोक यांच्याद्वारा राष्ट्रप्रेम, स्वामीनिष्ठा यांच्या शिकवणीमधून महाराष्ट्राचे प्रबोधन करणार्या रामदास स्वामींच्या पुण्यतिथीचा (Ramdas Swami Punyatithi) आज (15 फेब्रुवारी) दिवस आहे. महाराष्ट्रात समर्थ संप्रादयाची सुरूवात करणार्या रामदास स्वामींचे विचार पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आज त्यांचे हे विचार तुमच्या पुढच्या पिढीला देखील द्यायला विसरू नका.
संत रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावातील आहे. सूर्य देवतेचे उपासक असलेल्या रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 मारूतींची स्थापना करून व्यायामशाळा सुरू करत व्यायामासाठीही प्रेरणा दिली.
पहा रामदास स्वामी यांचे विचार
- आळसे सुख मानू नये। चाहाडी मनास आणू नये॥ शोधल्याविण करू नये। कार्य काही॥
- जो व्यक्ती अधर्म करतो, बेईमानीने पैसा कमावतो, अविचारी असतो तो मूर्ख असतो.
- कोणाच्याही उपकारामध्ये फार काळ राहणं टाळा. जर कधी उपकार घ्यायची वेळ आलीच तर त्याची जाण ठेवून त्यामधून उतराई होण्याचाही वेळीच प्रयत्न करा.
- ज्यांनी आपल्याला कधीही त्रास दिला नाही त्यांना कळत नकळतही दुखावणं टाळा.
- गरीबीतून श्रीमंतीकडे जाणारा व्यक्ती जर परिस्थिती सुधारल्यावर जुन्या नात्यांना विसरला तर तो कायमच गरीब राहणार.
- कोणत्याही रस्त्यावरून चालताना तो मार्ग नेमका कुठे जातो याची माहिती एकदा नक्की करून घ्या.
- केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे
संत रामदास हे स्वराज्य रक्षणासाठी समर्थ शिवाजी महाराजांसोबत होते. तसेच ते तुकाराम महाराजांचे समकालीन होते.