जगभरात रमजानचा (Ramadan) पाक महिना साजरा केला जात आहे. यंदा कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे प्रत्येकजण घरी इबादत करीत आहे. सकाळी सेहरीपासून (Sehri) रोजा सुरू होतो आणि संध्याकाळी इफ्तारीसह (Iftar) उघडला जातो. उपवास संद्याकाळी खजूर खाऊन पूर्ण केला जातो. रमजानच्या पवित्र महिन्यात संपूर्ण 30 दिवस, मुस्लिम समुदाय उपवास करून अल्लाहची प्रार्थना करतात. रमजानचा पाक महिना 24 एप्रिल ते 23 मे दरम्यान असेल आणि रमजान संपताच ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जाईल. रोजामध्ये सकाळी ठराविक वेळी सूर्योदयाच्या आधी जेवण खाल्ले जाते आणि संध्याकाळपर्यंत काही न खाता-पीता उपवास केला जातो. सेहरीला सुन्नत म्हणतात. सूर्यास्तानंतर मुस्लिम समाज इबादत केल्यावर आपला उपवास सोडतात त्याला इफ्तारी म्हणतात. रमजानजा रोजा ठेवणे प्रत्येक मुसलमानासाठी महत्वाचे मानले जाते. या महिन्यात कुरान शरीफ (Quran) अस्तित्वात आले होते असे मानले जाते. यासाठीही या पूर्ण महिन्यात प्रार्थना केली जाते. दिवसभरात रोज पाच वेळा नमाज अदा केली जाते. (Shab-e-Qadr 2020: भारतात कधी आहे शब-ए-कद्र ! जाणून घ्या या रात्री इबादत करण्याचे महत्त्व)
रमजान महिन्यास मुस्लिम समाजात मोठे महत्व आहे. इबादतचा महिना अर्थात अल्लाहला प्रसन्न करून घेण्याचा हा महिना मानला जातो. दरम्यान, इस्लामिक कॅलेंडरनुसार नवीन दिवस मध्यरात्री नव्हे तर सूर्यास्ताने सुरू होईल. 27 वे रमजान 20 मेच्या संद्याकाळी सुरु होईल , म्हणजेच 20 मे रोजी संध्याकाळी 21 मेच्या सकाळपर्यंत मुस्लिम विशेष प्रार्थना करतील. या पवित्र महिन्याच्या काळात राज्यातील महत्वाच्या शहरांमधील उद्या, 21 मेच्या सेहरी आणि इफ्तारच्या वेळा जाणून घ्या.
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:41
इफ्तार वेळ - 19:09
> पुणे -
सेहरी वेळ - 04:39
इफ्तार वेळ - 19:07
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:41
इफ्तार वेळ - 19:03
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:29
इफ्तार वेळ - 19:04
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:11
इफ्तार वेळ - 18:50
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:35
इफ्तार वेळ - 19:10
रोजा ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वतःवर विश्वास आणि अल्लाहची इबादत करणे. यंदा लॉकडाउनमुळे सर्व मुस्लिम धर्म गुरूंनी लोकांना बाहेर न पडता घरातच नमाज अदा करून हा पवित्र महिना साजरा करण्याचे आवाहन केले.