रमजानचा (Ramadan) पवित्र महिना सुरु आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे अनेक जणं आपल्या घरातच प्रार्थना करत आहेत. रमजानचा उपवास (रोजा) रोज संध्याकाळी संपवतात आणि सकाळी 'सेहरी' सोबत सुरु करतात. सूर्योदयाच्या अगोदर जे खाल्ले जाते ज्याला सेहरी (Sehri) म्हणतात. आणि दिवसभरच्या कडक उपवासानंतर सूर्यास्तनंतर उपवास सोडतात ज्याला इफ्तारी (Iftar) म्हणतात. रमजानजा रोजा ठेवणे प्रत्येक मुसलमानासाठी महत्वाचे मानले जाते. या महिन्यात कुराण शरीफ अस्तित्वात आले होते असे मानले जाते. यासाठीही या पूर्ण महिन्यात प्रार्थना केली जाते. गर्मीच्या दिवसात मुस्लिम बंधू सकाळपासून न खाता-पीता कडक उपवास करतात. पहाटेपासून रात्री पर्यंत दररोज वेळा पाच प्रार्थना केल्या जातात. या महिन्यात केली जाणारी प्रार्थनेचे महत्व इतर महिन्यांपेक्षा खूप पटीने जास्त आहे. असे म्हणतात की रोजा स्वर्गाचे द्वार खोलतो.
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे यंदा सर्व जण आपल्या घरातच कुराणचे पठन, रोजा ठेवणे, प्रार्थना करणे अशी धार्मिक कृत्ये करत आहेत. रमजान महिन्यात दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात, पहिली म्हणजे सहरी आणि दुसरी इफ्तार. सूर्य उगवण्यापूर्वी प्रत्येक दिवशी सेहरी केली जाते, ज्यामध्ये दररोज सकाळी निश्चित वेळी जेवण केले जाते. या पवित्र महिन्याच्या काळात राज्यातील महत्वाच्या शहरांमधील उद्या, 20 मेच्या सेहरी आणि इफ्तारच्या वेळा जाणून घ्या.
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:42
इफ्तार वेळ - 19:08
> पुणे -
सेहरी वेळ - 04:39
इफ्तार वेळ - 19:07
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:42
इफ्तार वेळ - 19:02
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:30
इफ्तार वेळ - 19:03
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:12
इफ्तार वेळ - 18:50
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:36
इफ्तार वेळ - 19:10
रोजा ठेवणे म्हणजे केवळ खाण्यापिण्यापासून दूर राहणेच नाही तर या वेळी डोळे, जीभ आणि कानवरही रोजा ठेवला जातो. म्हणजे रोजा ठेवणाऱ्याने चुकीच किंवा खोट बोलू नये, आणि कोणाबद्दल वाईट बोलू नये. म्हणून रोजा ठेवल्याने प्रत्येक जण पवित्र होते असे म्हटले जाते.