Rajmata Jijau Jayanti 2024 Messages: असं म्हणतात की जर एखाद्या आईने एखाद्या शूर व्यक्तीला जन्म दिला असेल तर ती आई खास असावी. अर्थातचं आपण महान योद्धा शिवरायांची माता 'जिजाबाई' (Jijabai) यांच्याविषयी बोलत आहोत. जिजाबाई (जिजाऊ) यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा (Buldhana) येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे सिंदखेड नावाच्या गावचे राजे होते. त्यांनी त्यावेळी जिजाबाईंचे नाव ‘जिजाऊ’ ठेवले होते. जिजाबाईंचे लग्न अगदी लहान वयात झाले होते.
जिजाबाई आणि शहाजींच्या लग्नानंतर विजापूरच्या महाराजांनी शाहजींच्या मदतीने अनेक युद्धे जिंकली, या आनंदात विजापूरच्या सुलतानाने त्यांना अनेक जहागीर भेट दिल्या. जहागीर असलेल्या शिवनेरी किल्ल्याचाही त्या भेटींमध्ये समावेश आहे. जिजाबाई आणि त्यांची मुलं इथे राहत असतं. जिजाबाईंना 6 मुली आणि दोन मुले होते. होते. त्यापैकी एक मुलगा शिवाजी होता. जिजाऊनी शिवबाला स्वराज्याचे धडे दिले होते. आजही जिजाऊंची प्रतिमा सर्वत्र एक शूर आई अशीच आहे. राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Whatsapp Status, Quotes द्वारे तुम्ही जिजाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज मोफत डाऊनलोड करता येतील. (हेही वाचा - Rajmata Jijau Jayanti Date: राजमाता जिजाऊंची जयंती कधी असते?)
स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ
राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !
राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त
त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन.
मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,
त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,
राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन!
थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब
उपकार कधी ना फिटणार…
चंद्र सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार…
स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब
यांना कोटी कोटी प्रणाम!!
जेव्हा-जेव्हा इतिहास वाचला जातो तेव्हा मराठा साम्राज्यात जर कोणाचे नाव प्रथम येते तर ते जिजाबाई आणि त्यांचे पुत्र शिवाजी यांचे. जिजाबाईंनी शिवाजींना असे शिक्षण दिले की त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. जिजाबाई या अतिशय हुशार महिला होत्या. त्यांनी मराठा साम्राज्यासाठी असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली.