Rajmata Jijau Jayanti 2022 HD Images: राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शुभेच्छांसाठी Messages, WhatsApp Status, Wishes, Images इतून करा डाऊनलोड
Rajmata Jijau Jayanti 2022 (File Image)

हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau Jayanti 2022) यांचा आज जन्मदिन. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात आणि कर्तृत्वात राजमाता जिजाऊंचा सिंहाचा वाटा राहिल्याचे इतिहास सांगतो. त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही महाराष्ट्राच्या गडकपारीत पाहायला मिळतात. आजही हजारो मनांना जिजाऊंचे कार्य प्रेरणा देते. जिजाऊंच्या पोटी जन्माला शिवरायांच्या कर्तृत्वामुळे त्यांना राजमाता ही पदवी मिळाली की त्या राजमाता होण्याचे गुण त्यांच्यात असल्यानेच त्या शिवबांसारखा राजा घडवू शकल्या? हे दोन प्रश्न वेगवेगळे असले तरी त्यांचे उत्तर मात्र राजमाता जिजाऊ यांच्यापाशीच येऊन थांबते. यातूनच त्यांच्या कार्याची थोरवी कळते. त्यांच्या जयंतीनिमित्त आजही अनेक शिवछत्रपतींच्या विचारांनी भारावलेले लोक प्रेरणा घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याचे प्रमाण कमी असले तरी, सहाजिकच आपण डिजिटल युगाचा आधार घेऊ शकता. म्हणूनच आम्ही राजमाता जिजाऊ जयंती निमित्त HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) आदी माध्यमांतून शेअर करण्यासाठी Messages, WhatsApp Status, Wishes आणि HD Images देत आहोत. ज्या आपण इथे अगदी मोफत डाऊनलोड करु शकता.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे म्हाळसाबाई आणि लखुजीराव जाधव या दाम्पत्याला 12 जानेवारी 1598 रोजी एक कन्यारत्न प्राप्त झाले. हे कन्यारत्न म्हणजेच जिजाबाई होय. या जिजाबाईंचा विवाह पुढे दौलताबाद येथे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांना एकूण सहा अपत्ये झाल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यापैकी चाल दगावली तर दोन वाचली. दगावलेल्या मुलांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद पाहायला मिळतात. दरम्यान, जी दोन वाचली त्यापैकी एक संभाजी. जो शहाजी राजांजवळ वाढला. तर दुसरा शिवाजी. जिजबाई जिजाबाई यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या या शिवजीनेच पुढे स्वराज्य स्थापन केले आणि त्याच स्वराज्याचे पुढे ते राजे झाले.

 

Rajmata Jijau Jayanti 2022 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2022 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2022 (File Image)
Rajmata Jijau Jayanti 2022 (File Image)

 

Rajmata Jijau Jayanti 2022 (File Image)

आपल्या संस्कारांना आलेले बळ आणि त्यातून घडलेले कर्तृत्व पाहण्याचा दुर्मिळ योग राजमाता जिजाऊ यांच्या आयुष्यात आला. महान व्यक्तिमत्वे केवळ महान नसतात तर ती सर्वार्थाने महान असतात. जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या शिवाजीने स्वराज्य स्थापन केले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. शिवरायांनी आपला राज्याभिषेक केला. आपल्या कर्तृत्ववान पुत्राच्या स्वराज्यात त्याचा राज्याभिषेक या कर्तृत्ववान महिलेने पाहिला आणि ती राजमाता झाली. पण, नीयतीचे गणीत काही वेगळेच होते. त्यांना राजमाता म्हणून फार काळ आनंद घेता आला नाही. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी 17 जून 1664 रोजी त्यांचे निधन झाले. धगधगत्या संस्कारांचा एक अग्निकुंड चिरशांत झाला. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या 76 वर्षांच्या होत्या.