Pulwama Terror Attack 3rd Anniversary: 2019 साली झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत 10 गोष्टी
Pulwama Attack Site | (Photo Credits: PTI)

14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा होत असला तरीही भारतामध्ये 3 वर्षांपूर्वी झालेला लष्करावरील हल्ला आपल्या देशासाठी दुखदं आठवणीचा दिवस आहे. सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर 14 फेब्रुवारी 2019 दिवशी Jaish-e-Mohammad शी संबंधित एका 20 वर्षीय चालकाने बॉम्बर कार ठोकून भीषण हल्ला घडवून आणला होता. यामध्ये 40 जवानांनी आपला जीव गमावला. भारतासाठी आतापर्यंतच्या सगळ्यात दुर्दैवी असलेल्या या हल्ल्याबाबत काही खास बाबी आज नक्की जाणून घ्या. नक्की वाचा: Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट.

पुलवामा दहशतवादी  हल्ल्याबाबत काही फॅक्ट्स!

1. Jaish-e-Mohammad (JeM)च्या सुसायड बॉम्बरचं नाव Adil Ahmed Dar होतं. तो 20 वर्षांचा तरूण होता. जिहादीस्ट असलेल्या या तरूणाने कार 35-40 सीआरपीएफ ट्रुप्स घेऊन जाणार्‍या बसला धडकली होती.

2. 14 फेब्रुवारी 2019 दिवशी हा हल्ला सुमारे 3 वाजून 15 मिनिटांनी झाला होता. या वेळी 78 बसचा कॉन्वॉय जम्मू मधून श्रीनगरला जात होता त्यामध्ये 2500 जवान होते.

3.पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानचे संबंध तणावग्रस्त झाले होते. Ministry of External Affairs ने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याला पाकिस्तानचे पाठबळ होते.

4.26 फेब्रुवारी दिवशी इंडियन आर्म्ड फॉर्सने त्यांना प्रतिहल्ला करत Line of Control वरील Jaish-e-Mohammad camps वर सर्जिकल स्ट्राईक केला.

5.ऑगस्ट 2020 मध्ये तब्बल 18 महिन्यानी National Investigation Agency (NIA)कडून 13,500 पानांचे चार्जशीट जम्मूच्या स्पेशल कोर्ट मध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये 19 जणांवर दहशतवादी हल्ला घडवल्याचा आरोप आहे. त्यामध्ये Masood Azhar,chief of Pakistan terror group JeM चा देखील समावेश आहे.

6.चार्जशीट मधील माहितीमध्ये सुसाईड बॉम्बर Adil Ahmed Dar हा 200 किलो स्फोटकं घेऊन आला होता.

7. चार्जशीट मध्ये Masood Azharसोबत त्याचे भाऊ Abdul Rauf आणि Ammar Alvi तसेच पुतण्या Mohammed Umer Faroo यांचाही समावेश होता. Mohammed Umer Faroo हा 2018 मध्ये भारतात घुसला होता आणि त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता

8.चार्जशीट मधील 19 आरोपींपैकी 12 जण कश्मीरचे रहिवासी होते. तर Masood Azhar Alvi, Rouf Asgar Alvi, Ammar Alvi, Qari Mufti Yasir (मृत), Mohammad Ismail, Muhammad Umar Farooq (एन्काऊंटर मध्ये ठार), Kamran Ali (एन्काऊंटर मध्ये ठार) हे 7 पाकिस्तानी रहिवासी होते.

9.कश्मीरच्या रहिवाशांपैकी Shakir Bashir, Insha Jan, Peer Tariq Ahmed Shah, Waiz-ul-Islam, Mohammad Abbas Rather, Bilal Ahmed Kuchhey, Mohd Iqbal Rather, Sameer Ahmad Dar, Ashaq Ahmed Nengroo, Adil Ahmed Dar (सुसाईड ब्ॐबर ठार), Sajjad Ahmed Bhat (एन्काऊंटर मध्ये ठार) , Mudasir Ahmad Khan (मृत) यांचा समावेश होता.

10. एनआयए च्या तपासामध्ये समोर आलेल्या गोष्टीत पाकिस्तानच्या शकरगढ येथील लाँच पॅडवरून दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत ढकलण्यात पाकिस्तानची भूमिका उघड झाली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याने सारेच हादरले होते. या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयांच्या मनात इच्छा होती. सैनिकांचे जीव धोक्यात न घालता एअर स्ट्राईकद्वारा सुरक्षितपणे हल्ला करण्याचा प्रयत्न  हे  भारतीय वायुसेनेचं मोठं यश समजलं जातं.