Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घरबसल्या टीव्ही, ऑनलाईन माध्यमातून असे घेऊ शकाल!
Vitthal-Rukmini | Photo Credits: Facebook

Ashadi Ekadashi 2020 Vitthal Rukmini Live Darshan:  महाराष्ट्रात आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढती रूग्णसंख्य पाहता धार्मिक स्ठळं बंद असल्याने यंदा आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रूक्मिणीचं भाविकांना, वारकर्‍यांना दर्शन घेणं शक्य नाही. परंतु, भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी चे ऑनलाईन दर्शन (Online Darshan) घेता येणार आहे. तसेच दूदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर देखील विठ्ठल रूक्मिणीची पुजा आणि देवळातील आजची पूजा पाहता येणार आहे. सकाळी 9 ते 11 दरम्यान हा सोहळा पाहता येईल. Ashadhi Ekadashi 2020 Images: आषाढी एकादशी निमित्त Wishes, HD Wallpaper, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरा करा विठुरायाचा उत्सव!

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. (हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2020 Date: आषाढी एकादशी यंदा 1 जुलै दिवशी; जाणून घ्या व्रत, मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ)

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन

• संकेतस्थळ- http://www.vitthalrukminimandir.org

• गुगल प्ले स्टोअरवरील ॲप- shreevitthalrukmnilive Darshan

• जिओ टीव्ही- जिओ दर्शन

• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल

चमत्कार! नदीतून वर आले मंदिर; ५०० वर्षांपूर्वीच मंदिर असल्याचा पुरातत्त्व अभ्यासकांचा अंदाज - Watch Video 

वरील विविध माध्यमांतून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार पाहता येणार आहे. यंदा 1 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांनी पंढरपूरात येणं टाळावं. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केलं आहे.