Ashadhi Ekadashi 2020 Images: आषाढी एकादशी निमित्त Wishes, HD Wallpaper, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरा करा विठुरायाचा उत्सव!
Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)

Ashadi Ekadashi 2020 Images : महाएकादशी समजली जाणारी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आज (1 जुलै) महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे. तर वारकरी संप्रदायातील लोक विठुरायाला भेटण्यासाठी हजारो किमी पायी प्रवास करतात. पंढरीच्या वारीमधील प्रत्येक दिवस हा विठुरायाच्या गजराने भक्तीमय झालेला दिसून येतो. मात्र यंदा आषाढ वारीच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याने वारी रद्द करण्यात आली आहे. परंतु तरीही प्रत्येक वारकरी विठुरायाचे नाव घेत घरच्या घरी किंवा गावातल्या गावात आजचा सण साजरा करताना दिसून येणार आहे.

देवशयनी (Devshayni Ekadashi) म्हणूनही आजची एकादशी ओळखली जाते. तर आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतातते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुत आहे. म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11 ला होतो व कार्तिक शुक्ल 11 ला संपतो. आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल भक्त उपवास करतात. तर यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त Wishes, HD Wallpaper, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरा करा विठुरायाचा उत्सव!(Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी निमित्त जाणून घ्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या हरिपाठाचे महत्त्व)

Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)
Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)
Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)
Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)
Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)
Ashadi Ekadashi (Photo Credits-File Image)Ashadhi

नामस्मरण आणि भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग भागवत धर्मात सांगितला आहे. तसंच भागवत धर्मात जातीभेद मानत नसल्याने सर्व जाती, पंथांचे लोक एकत्र येऊन पंढरीची वारी करतात. तुकाराम, नामदेव, जनाबाई या संतांनी विठ्ठलभक्तीची महती लोकांपर्यंत पोहचवली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलभक्तीची परंपरा सुरु झाली. सुरु झालेली ही परंपरा वारकरी संप्रदायाकडून अद्याप अखंड सुरु आहे.