Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी निमित्त जाणून घ्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या हरिपाठाचे महत्त्व
विठ्ठल रखुमाई मंदिर । Photo Credits: instagram.com/vithu.mauli

Ashadi Ekadashi 2020: यंदा आषाढी एकादशी 1 जुलै म्हणजेचं बुधवारी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असतं. वारकरी संप्रदयामध्ये आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी वारकरी विठ्ठलाच्या अभंग, हरिपाठाचे गायन करून पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतात. आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वरांनी रचलेल्या हरिपाठाचं महत्त्व जाणून घेऊयात.

हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचना केलेले हरिपाठ जास्त गायले जातात. (हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2020: पंढरपुरामध्ये तयारी अंतिम टप्प्यात; विठ्ठल रूक्मिणी मंदिर सजावट ते संचारबंदी नियम कोरोना संकटात असा असेल आषाढीचा सोहळा)

ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग या काव्यरचना केल्या आहेत. वारकरी संप्रदायाच्या भजन परंपरेत आणि नित्य पाठामध्ये हरिपाठाचे स्थान वेगळे आहे. हरिपाठ हा उभं राहून टाळ-मृदंगांच्या गजरात सादर केला जातो. अनेक विठू भक्त सकाळी स्नान केल्यानंतर संपूर्ण हरिपाठाचे गायन करतात. ज्ञानदेवांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेले सर्वस्पर्शी सुबोध भक्तिप्रबोधन म्हणजे ‘हरिपाठ’ होय. (Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी 2020 मध्ये कधी आहे? जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ)

यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटामुळे वारकऱ्यांनी आषाढी वारी घरात राहूनचं साजरी करावी. वारकऱ्यांनी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यावर्षी पंढरपुरामध्ये विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनाला वैष्णवांचा मेळा दाखल होणार नसला तरीही मंदिर प्रशासनाकडून आषाढी एकादशी निमित्त आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठूरायाची सपत्निक शासकीय महापूजा पार पडणार आहे.