Pandharpur Wari | (File Image)

महाराष्ट्रामध्ये यंदा दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) साठी दिंडी, पायी वारी निघाली आहे. काही पालख्यांचे प्रस्थान झाले आहे तर काही येत्या काही दिवसांत प्रस्थान ठेवणार आहेत. संत तुकोबा रायांची आणि ज्ञानोबा रायांची पालखी 20, 21 जून दिवशी प्रस्थान ठेवणार आहे. या वारी मध्ये सहभागी वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर देखील सोयी-सुविधा राबाण्याचं काम सुरू झालं आहे. दरम्यान आज 21व्या शतकात वारी देखील व्हर्च्युअल झाली आहे. वारकर्‍यांच्या मदतीला तंत्रज्ञानाच्या जोडीने काही अ‍ॅप्स मदत करणार आहे. जाणून घेऊ यंदा वारी सफळ संपूर्ण करण्यासाठी कोणती अ‍ॅप्स नेमकी काय मदत करू शकतात?

YouTooCanRun App

पंढरीची वारी सार्‍यानांच पायी चालणं शक्य नाही. पण व्हर्च्युअली ही वारी पूर्ण करण्यासाठी प्ले स्टोअर वर आज YouTooCanRun App लॉन्च करण्यात आलं आहे. याद्वारा तुम्ही व्हर्च्युअली वारी करू शकणार आहात. पायी वारीचंच अंतर आणि तितक्याच दिवसांत तुम्ही थेट वारीत सहभागी न होता पूर्ण करू शकता. यामध्ये 258 किमीचा वारीचा रस्ता पूर्ण करण्यासाठी 3,40,000 पावलं तुम्हांला चालावी लागणार आहेत. 20 जून ते 10 जुलै असा 17 दिवसांचा हा ऑनलाईन प्रवास असणार आहे.

वारीसाठी रजिस्ट्रेशन - https://youtoocanrun.com/races/walk-with-wari/

Pandharichi Wari App

पंढरपूरची वारी अ‍ॅप हे देखील वारकर्‍यांच्या मदतीला असणार आहे. या अ‍ॅपमध्ये अनेक महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर तुम्ही या अ‍ॅपचा वापर करू शकाल. पंढरपूर मध्ये सार्‍या पालख्या पोहोचल्यानंतरही हे अ‍ॅप दिशादर्शक ठरणार आहे. या अ‍ॅपवर पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिराकडे जाण्याच्या मार्ग आणि अन्य महत्त्वाची ठिकाणे दाखवण्यास मदत करेल. पालखीची मुक्कामाची ठिकाणे, विसावा या ठिकाणी असलेल्या सुविधा या अ‍ॅपवरून शोधणे शक्य होणार आहे. वारी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टॅँकर, शौचालय, जवळील शासकीय कार्यालये, पोलिस ठाणे, हॉस्पिटल, मंदिर, वाहनतळ, शाळा या गोष्टी अ‍ॅपवर समजतील.

(हे देखील नक्की वाचा: Pandharpur Wari 2022 Palkhi Time Table: पंढरपूर विठोबा-आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कार्यक्रम, घ्या जाणून).

महिल्या आयोगाच्या निर्देशानुसार वारीत दर 10-20 किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी शौचालय आणि आंघोळीसाठी व्यवस्था केली जाणार आहे. ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन लावली जाणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबतचे पत्रक पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे