Pandharpur Wari | (File Image)

Ashadi Wari 2022 Timetable: पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar) यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्का इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीने दिली आहे. कोरोना काळात पालखीला खंड पडल्याने दोन वर्षानंतर प्रथमच पारंपरीक पद्धतीने पालखी सोहळा आषाढी वारीच्या (Pandharpur Wari 2022 Palkhi Ceremony) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्तान ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

पंढरपूर आषाढी वारी 2022 वेळापत्रक कार्यक्रम (तारखेनुसार)

संत तुकाराम पालकी सोहळा कार्यक्रम

  • तुकाराम महाराजांच्या पालखीतील महत्त्वाचे दिवस

    पालखी प्रस्थान - 20 जून 2022

  • पहिलं गोल रिंगण - 30 जून 2022 (बेलवंडी)
  • दुसरं गोल रिंगण - 2 जुलै 2022 (इंदापूर)
  • तिसरं गोल रिंगण - 5 जुलै 2022 (अकलूज माने विद्यालय)
  • पहिलं उभं रिंगण - 6 जुलै 2022 (माळीनगर)
  • दुसरं उभं रिंगण - 8 जुलै 2022 (बाजीराव विहीर)
  • तिसरं उभं रिंगण - 9 जुलै 2022 (पादुका आरती)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कार्यक्रम

दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आषाढी वारी पारंपरीक पद्धतिने साजरी होत आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये होणारी गर्दी विचारात घेऊन योग्य त्या उपाययोजना, खबरदारी, सुरक्षा, आरोग्य यांबाबत आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.