Narali Purnima 2024 Messages: नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2024) हा मच्छिमार समाजाचा एक विशेष सण असून तो दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कॅलेंडरनुसार, या वर्षी नारळी पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि विशेषत: भगवान वरुण देवाची पूजा करतात. तसेच समूद्राला नारळ अर्पण करतात. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषत: कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह अधिक असतो. या दिवशी कोळी बांधन समूद्राची पूजा करून समुद्रात नारळ अर्पण करतात.
महाराष्ट्र आणि कोकणी प्रदेशाव्यतिरिक्त गोवा आणि गुजरातच्या किनारी भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव एकमेकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Narali Purnima Wishes, Narali Purnima Quotes, Narali Purnima WhatsApp Status द्वारे कोळी बांधवांना खास शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही लेटेस्ली मराठीने तयार केलेल्या खास शुभेच्छांच्या ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Narali Purnima 2024 Special Marathi Songs: नारळी पौर्णिमेनिमित्त 'ही' खास मराठमोळी कोळीगीत ऐकूण साजरा करा कोळीबांधवांचा खास सण!)
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आज आला
नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !
कोळी बांधवांचा सण,
उधाण आनंदाला,
कार्यारंभ करती,
अर्पूण नारळ सागराला…
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सण आयलाय गो आयलाय गो
नारळी पुनवेचा !
मनी आनंद मावना
कोळ्यांचे दुनयेचा !
अरे बेगीन बेगीन चला किनारी
जाऊ देवाच्या पुंजेला…
हात जोडूनी नारळ सोन्याचा सोडूया दर्याला !
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
नारळी पौर्णिमा तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नारळी पौर्णिमा ही मासेमारीच्या हंगामाची सुरुवात मानली जाते. त्यामुळे या दिवशी मच्छीमार समाजातील लोक वरुण देवाची पूजा करतात आणि त्यांला नारळ अर्पण करतात. समुद्रातून जास्तीत जास्त मासे पकडण्यासाठी ते त्याचा आशीर्वाद घेतात.