Indian Army Day Wishes (फोटो सौजन्य - File Image)

Indian Army Day Wishes In Marathi: 15 जानेवारीलाच केएम करिअप्पा (K. M. Cariappa) यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची कमान घेतली. भारतीय लष्करासाठी (Indian Army) हा अत्यंत खास क्षण होता. या दिवशी प्रथमच देशाच्या लष्कराचे नेतृत्व भारतीयाच्या हाती आले. या कारणास्तव दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिन साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याने प्रथमच भारतीय लष्करी अधिकाऱ्याला कमांडर-इन-चीफ पद दिले. कमांडर-इन-चीफ हे तिन्ही सैन्यांचे प्रमुख आहेत. यंदा भारतीय लष्कर 76 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.

या गौरवशाली प्रसंगी, नवी दिल्ली आणि देशातील विविध लष्करी मुख्यालयांमध्ये लष्करी परेड, लष्करी प्रदर्शने आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी देशाच्या सैन्याच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण केले जाते. भारतीय सैन्य दिनानिमित्त खालील Images, WhatsApp Status, Messages, Quotes द्वारे तुम्ही भारतातील शूर जवानांना सलाम करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

दहशतवाद्यांना माफ करणं हे

देवाचं काम आहे,

पण त्यांना देव भेटायला लावणं हे

आपलं काम आहे.

भारतीय सैन्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Indian Army Day Wishes (फोटो सौजन्य - File Image)

देशाच्या सीमेवर रक्षण करताना आपले

सर्वस्व त्यागणाऱ्या भारतीय जवानांना सलाम..!

भारतीय सैन्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Indian Army Day Wishes (फोटो सौजन्य - File Image)

राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक

असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम!

भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Indian Army Day Wishes (फोटो सौजन्य - File Image)

कितीही श्रीमंती असली तरीही

हा पोशाख आणि हा रुबाब

तुम्ही विकत घेऊ शकत नाही

तो कमवावा लागतो

भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Indian Army Day Wishes (फोटो सौजन्य - File Image)

भारतमातेच्या संरक्षणासाठी

आपल्या जीवावर उदार होऊन

रक्षण करणाऱ्या वीर जवानांना..सलाम..

भारतीय सैन्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Indian Army Day Wishes (फोटो सौजन्य - File Image)

भारतीय लष्कराची स्थापना ब्रिटिश साम्राज्यात झाली. 1949 मध्ये जनरल फ्रान्सिस बुचर हे शेवटचे ब्रिटिश कमांडर होते. त्यांच्या जाण्यानंतर लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी बनले. त्यामुळे हा दिवस भारतीय लष्करासाठी खास आहे.