Haldi Kumkum 2025 Rangoli Designs: देशभरात मकर संक्रातीचा सण 14 जानेवारीला मोठ्या उत्साहात पार पडला. मकर संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत विवाहित महिला आपल्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. या दिवशी महिला आपल्या घरी मैत्रिणींना बोलवून त्यांना हळदी-कुंकू (Haldi Kunku) लावतात आणि भेटवस्तू म्हणून वाण देतात. महाराष्ट्रात ही परंपरा आजही पाळली जाते. सध्या सर्वत्र हळदी-कुंकवासाठी महिलांना आमंत्रण देण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक महिला हा दिवस आणखी खास कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या निमित्ताने विवाहित महिला घरी तीळ आणि गुळाचे लाडू बनवतात. हळदी कुंकू समारंभात, महिला एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि शाश्वत सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. तुम्ही देखील तुमच्या घरी हळदी-कुंकवाच्या (Haldi Kunku) कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तर, आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर, अंगणात स्पेशल रांगोळी (Haldi Kumkum Rangoli Designs) काढून तुमच्या घरी येणाऱ्या सर्व महिलांची मनं जिंकू शकता.
हळदी कुंकू रांगोळी डिझाइन्स व्हिडिओ -
मकर संक्रांती हा हिवाळ्याच्या महिन्यांच्या समाप्तीचे प्रतीक मानला जातो. या सणापासून दिवस मोठे होऊ लागतात. उत्तर भारत, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाणा, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच या सणानंतर हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची देखील परंपरा आहे.